होळीचा सण साजरा करताना...दृष्टीक्षेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 01:16 AM2019-03-19T01:16:24+5:302019-03-19T01:16:39+5:30
-चंद्रकांत कित्तुरे- उ द्या सर्वत्र होळीचा सण साजरा होत आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही लहान ...
-चंद्रकांत कित्तुरे-
उ द्या सर्वत्र होळीचा सण साजरा होत आहे. त्याची जय्यत तयारी सुरू आहे. शहराबरोबरच ग्रामीण भागातही लहान मुले, तरुणाईला पंधरा दिवस आधीच होळीच्या सणाचे वेध लागतात. होळीसाठी गोवऱ्या (शेणी), लाकडे गोळा करण्याचे काम त्यांच्याकडून सुरू होते. बऱ्याचवेळेला यासाठी ते हुडवा किंवा लाकडांच्या ढिगावरही डल्ला मारतात. पूर्वी हे प्रमाण खूपच असायचे, अलीकडे ते कमी झाले आहे. तरीही उत्साह कमी झालेला नाही. होळी म्हणजे वाईट प्रवृत्तीचे दहन असे मानले जाते. या दिवशी गोवºया रचून पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून ती पेटविली जाते. होळीत पुरणपोळी ठेवून ती खरपूस भाजल्यानंतर काढून खाण्यासही दिली जाते. होळीभोवती मुले शंखध्वनी करत फेºयाही मारतात. होळीच्या उत्सवाला होलिकोत्सव, होलिकादहन, शिमगा, शिमगोत्सव अशा नावांनी वेगवेगळ्या भागात संबोधले जाते. याच दिवसापासून थंडी कमी होऊन उन्हाळा तीव्र होऊ लागतो. होळीत थंडी जळाली, असेही ग्रामीण भागात म्हटले जाते.
शहरात तसेच खेड्यातील घरगुती व सार्वजनिक मंडळांकडून होळीचे दहन केले जाते. कोल्हापूर शहरात सुमारे पाच हजार मंडळे होळी साजरी करीत असल्याचे सांगण्यात येते. या मंडळांकडून बºयाचवेळा होळीसाठी रस्ता खोदला जातो. तो बुजविण्यासाठी कुणी प्रयत्न करताना दिसत नाही. त्यामुळे मोठे खड्डे खोदण्याला विरोध होतो आहे. होळीसाठी गोळा केलेल्या गोवºया अथवा लाकडांचे दहन न करता ते दान करावे, अशी चळवळ ‘होळी लहान, पोळी दान’ या स्वरूपात गेल्या काही वर्षांपासून कोल्हापूरसह राज्यात सुरू झाली आहे. तिला प्रतिसादही वाढत आहे. त्यामुळे होळीची उंचीही आता छोटी होत आहे. कोल्हापुरात तर वर्षाला लाखो शेणी दान केल्या जातात. कोल्हापूरचे वैशिष्ट्य म्हणजे येथे अंत्यसंस्कारासाठी शेणी वापरल्या जातात. बहुधा शेणी वापरणारी ही महानगरपालिका एकमेव असावी. होळीच्या निमित्ताने गोळा होणाºया शेणी अंत्यसंस्कारासाठी दान करण्याचे प्रमाण मोठे आहे. गोळा केलेल्या शेणींमधील काही शेणी प्रातिनिधीक स्वरूपात घेऊन छोटी होळी पेटविली जाते. उर्वरित शेणी दान करण्याचे प्रमाणही अलीकडे वाढत आहे.
पूर्वी होळीसाठी मोठ्या प्रमाणात झाडांचीही कत्तल केली जायची. त्यामुळे पर्यावरणाचाही ºहास होत असल्याची तक्रार होती. त्यामुळे झाडे न तोडण्याचे आवाहन करणारे कार्यकर्ते पुढे आले. त्यांनी याबाबत समाज प्रबोधनाच्या माध्यमातून जनतेमध्ये जागरूकता निर्माण केली. त्याचाही परिणाम होळीसाठी झाडे तोडण्याचे प्रमाण कमी होण्यात झाला आहे. होळीच्या दुसºया दिवशी धुलिवंदन किंवा धुळवड साजरी केली जाते. होळीची राख गोळा करून तिचे गोळे करून सकाळी लहान मुलांकडून, नागरिकांकडून वर्गणी वसूल करण्यासाठी वापर केला जातो. अलीकडे याचेही प्रमाण खूपच कमी झाले आहे. पर्यावरण रक्षणासाठी होळीच्या स्वरूपात होणारे बदल खूपच चांगले आहेत.
वाईट विचारांचे, प्रवृत्तींचे दहन होळीच्या माध्यमातून केले जाते. दुष्ट प्रवृत्ती या होळीत जळून खाक होतात. असा यामागचा भाव आहे. होळीनंतर आपल्याकडे रंगपंचमी येते. उत्तर भारतात ती होळीदिवशीच साजरी केली जाते. रंगपंचमी म्हणजे जल्लोषाचा, वेगवेगळ््या रंगात न्हाऊन निघण्याचा सण. विशेषत: तरुणाईसाठी तो खूपच आवडता असतो. या दिवशी रस्त्या-रस्त्यावर एकमेकाच्या अंगावर रंगाची उधळण करीत असतात. पिवडी किंवा सुके रंग तसेच जलरंग यांचा स्वैरवापर केला जातो. बºयाच वेळेला तरुणी, महिला यांना लक्ष्य बनवून त्यांच्या अंगावर रंग टाकण्याचे प्रकारही काही ठिकाणी घडतात. यावरून वादावादीचे प्रसंग उद्भवतात. ते टाळण्यासाठी तरुणाईने स्वत:च संयम बाळगायला हवा. काही वेळेला अंडी डोक्यात फोडण्याचे प्रकारही घडतात.
बºयाच वेळा रंग डोळ््यांत जाणे किंवाडोक्याचे केस खराब होणे, असेही घडते. त्यामुळे त्वचेचे विकार जडू शकतात. रंगपंचमीसाठी रासायनिक रंगाचा वापर टाळायला हवा. नैसर्गिक रंगाचा वापर करायला हवा, झाडांच्या पानांपासून, फुलांपासून वेगवेगळ््या प्रकारचे रंग तयार केलेजाऊ शकतात. मुलांना असे रंग तयार करायला शिकवायला हवे. अलीकडे फुलझाडे, फळझाडेकमी झाली आहेत. त्यांची लागवडही वाढायला
हवी. मुलांना पर्यावरणाचे महत्त्व समजावून सांगायला हवे. यासाठी काही मंडळेही कार्यरत आहेत.
त्यांनाही प्रतिसाद द्यायला हवा. आपणही होळी साजरी करताना वाईट विचारांचे, आचारांचे, व्यसनांचे
दहन करायला हवे. इतरांनाही त्यासाठी प्रवृत्त करायला हवे.