कोरोनाचे नियम पाळत महावीर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2021 04:21 AM2021-04-26T04:21:46+5:302021-04-26T04:21:46+5:30
फोटो (२५०४२०२१-कोल-महावीर जयंती गंगावेश मंदिर) : कोल्हापुरात रविवारी गंगावेश येथील पार्श्वनाथ मानस्तंभ दिगंबर जैन मंदिर येथे सकाळी नित्य नियमित ...
फोटो (२५०४२०२१-कोल-महावीर जयंती गंगावेश मंदिर) : कोल्हापुरात रविवारी गंगावेश येथील पार्श्वनाथ मानस्तंभ दिगंबर जैन मंदिर येथे सकाळी नित्य नियमित घंटानाद करून भगवान महावीरांची पंचामृत अभिषेक पूजा झाली.
चौकट
गंगावेश मंदिरात अभिषेक पूजा
गंगावेश येथील पार्श्वनाथ मानस्तंभ दिगंबर जैन मंदिर येथे सकाळी नित्य नियमित घंटानाद करून भगवान महावीर यांची पंचामृत अभिषेक पूजा झाली. यावेळी भगवान महावीर यांचा जन्मकाळ पाळणा आणि इतर सर्व धार्मिक विधी स्थानिक पंडित निशांत उपाध्ये यांनी केले.
चौकट
पंचरंगी धर्मध्वज, णमोकार महामंत्र
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जैनबांधवांनी आपआपल्या घरी भगवान महावीर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. णमोकार महामंत्राचा जप केला. त्यांनी घराबाहेर पंचरंगी धर्मध्वज लावला होता. कोरोनामुळे सलग दुसऱ्यावर्षी जैनबांधवांना महावीर जयंती सामुदायिकपणे साजरी करता आली नाही. त्यांनी भगवान महावीर यांनी दिलेल्या ‘जगा आणि जगू द्या’ या उपदेशाचे पालन करत घरीच जयंती साजरी केल्याचे भगवान महावीर प्रतिष्ठानचे सचिव सुरेश मगदूम यांनी सांगितले.
===Photopath===
250421\25kol_14_25042021_5.jpg~250421\25kol_15_25042021_5.jpg
===Caption===
फोटो (२५०४२०२१-कोल-भगवान महावीर जयंती ०१ व ०२) : कोल्हापुरात रविवारी कोरोनाच्या नियमांचे पालन करून भगवान महावीर जयंती साजरी झाली. रूईकर कॉलनीतील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे पारंपरिक पद्धतीने भगवान महावीर यांच्या मूर्तीचा पंचामृत अभिषेक करण्यात आला. ~फोटो (२५०४२०२१-कोल-भगवान महावीर जयंती ०१ व ०२) : कोल्हापुरात रविवारी कोरोनाच्या नियमांचे पालन करून भगवान महावीर जयंती साजरी झाली. रूईकर कॉलनीतील श्री १००८ भगवान महावीर दिगंबर जैन मंदिर येथे पारंपरिक पद्धतीने भगवान महावीर यांच्या मूर्तीचा पंचामृत अभिषेक करण्यात आला.