वर्गणीची सक्ती न करता कोल्हापूरात शिवजयंती उत्सव
By admin | Published: April 3, 2017 01:42 PM2017-04-03T13:42:45+5:302017-04-03T13:42:45+5:30
संयुक्त उत्तरेश्वर पेठेतील मंडळांचा निर्णय : पन्नास हून अधिक संस्थांचा सहभाग
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : वर्गणीची सक्ती न करता सभासद वर्गणीतून डॉल्बीमुक्त, पारंपारीक शिवचरित्राला अभिप्रेत शिवजयंती उत्सव साजरा करण्याचा निर्णय संयुक्त उत्तरेश्वर पेठेने केला आहे. उत्तरेश्वर पेठेतील ५० हून अधिक तरुण मंडळे, तालीम संस्था, महिला मंडळे, बचत गट यांची बैठक श्री उत्तरेश्वर शिवभक्त कला क्रीडा, सांस्कृतिक मंडळाच्यावतीने श्री उत्तरेश्वर महादेव मंदिरात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी वाघाच्या तालमीचे अध्यक्ष विनायक साळोखे हे होते.
उत्सव कमीटीचे मावळते अध्यक्ष योगेश पाटील यांनी प्रास्ताविकात गतवर्षीच्या उत्सवाचा आढवा घेतला. सुरेश कदम यांनी मागील वर्षाचा ताळेबंद सादर केला. मंडळाचे मार्गदर्शक किशोर घाटगे यांनी २८ एप्रिल रोजी होणारा संयुक्त उत्तरेश्वर पेठेचा शिवजयंती उत्सव हा डॉल्बीमुक्त, पारंपारिक पध्दतीने विवीध प्रबोधनात्मक पध्दतीने साजरा व्हावा. यामध्ये पेठेतील अबालवृध्दांचा सहभाग असावा असे मत व्यक्त केले.
वर्गणीची सक्ती न करता सभासद वर्गणीतून उत्सव साजरा करण्यात यावा अशी सुचना आण्णा पसारे यांनी केली. दिपक घोडके यांनी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असावा त्यासाठी महिलांची समिती गठीत करावी अशी सुचना मांडली. किरण पोवार यांनी तज्ञांची व्याख्याने व्हावीत असे सुचवले.
गड किल्यांची स्वच्छता मोहीमेने उत्सवाला प्रारंभ करावा असे अनिकेत भोसले यांनी सुचवले. यावेळी मिरवणूक समिती, सजावट समिती, प्रसिध्द समिती, स्पर्धा समिती, व्याख्यान समिती, गडकिल्यांची स्वच्छता समिती यासह विवीध समित्या करण्याचे नियोजन करण्यात आले. पारंपारिक पध्दतीने घोडे, उंट, शिवप्रतिमेसह, ढोलताशे पथके, झांज पथक, धनगरी ढोल, मुलींचे लेझीम पथक, मर्दानी खेळ, हालगी पथक, वारकरी भजनी मंडळ, या वाद्यांसह प्रबोधनात्मक फलकासह भव्य मिरवणूक सोहळा साजरा करण्याचे ठरविण्यात आले.
यावेळी स्वप्नील सावंत, जयदिप भोसले, कुमार अतिग्रे, सनी अतिग्रे, किशोर माने, जलराज कदम, अक्षय जाधव, अवधूत सुर्वे, सुनिल माने, प्रदीप सुतार, सुधीर साळोखे यांनी विवीध सुचना व कल्पना मांडल्या. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित होते. संदीप सुतार यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)