महापालिकेच्यावतीने कलामहर्षी बाबूराव पेंटर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2020 04:33 PM2020-06-03T16:33:14+5:302020-06-03T16:34:33+5:30
कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने पद्माराजे उद्यान येथील कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या पुतळ्यास महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कोल्हापूर : कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने पद्माराजे उद्यान येथील कलामहर्षी बाबूराव पेंटर यांच्या पुतळ्यास महापौर निलोफर आजरेकर व आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अशा तीनही कलांमध्ये बाबूराव पेंटर यांनी आपले असामान्य कौशल्य सिद्ध केले. भारतीय बनावटीचा पहिला चित्रीकरणाचा कॅमेरा त्यांनी तयार केला. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना कलामहर्षी या पदवीने गौरविण्यात आले. त्यांची आठवण नव्या पिढीला रहावी म्हणून त्यांच्या जयंतीदिनी महापालिकेमार्फत अभिवादन केले जाते.
बुधवारी झालेल्या कार्यक्रमात उपशहर अभियंता रमेश मस्कर, कनिष्ठ अभियंता सुनील भाईक, चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी यमकर, संचालक सतीश बीडकर, रणजित जाधव, रवींद्र गावडे, अर्जुन नलवडे, सुरेश पन्हाळकर, इम्तिहाज बारगीर, सहखजानीस शरद चव्हाण, व्यवस्थापक रवींद्र बोरमाळ, सुरेश चौगुले, सुरेंद्र पाटील, दिलीप काटे, मिलींद अष्टेकर, मोहन कुलकर्णी व कलाकारप्रेमी उपस्थित होते.