दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारी असोसिएशनतर्फे आनंदोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:40+5:302021-07-07T04:28:40+5:30
कोल्हापूर : शहरातील व्यापार, दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने सोमवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोरोना नियमांच्या पालनाबाबत ...
कोल्हापूर : शहरातील व्यापार, दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारी असोसिएशनच्या वतीने सोमवारी आनंदोत्सव साजरा करण्यात आला. कोरोना नियमांच्या पालनाबाबत व्यापारी, व्यावसायिकांना आवाहन करणारी रॅली काढण्यात आली.
येथील जनता बझार चौकात राजारामपुरी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आनंदोत्सव साजरा करण्यात आला. महिला उद्योजिका रक्षा राऊत यांच्या हस्ते केक कापण्यात आला. व्यापार सुरू करण्यास मिळालेली परवानगी कायम रहावी यासाठी व्यापारी आणि ग्राहक स्वयंशिस्त पाळतील आणि व्यापार कायम सुरू ठेवतील, असा विश्वास ललित गांधी यांनी व्यक्त केला. यावेळी उपाध्यक्ष प्रशांत पोकळे, सचिव रणजित पारेख, सहसचिव विजय येवले, खजानीस अनिल पिंजाणी, संचालक माणिक पाटील-चुयेकर, स्नेहल मगदुम, दीपक पुरोहित, भरत रावळ, इंदर चौधरी, श्याम बासराणी, युवराज राणिंगा, मनोज शहा आदी उपस्थित होते. असोसिएशनतर्फे ‘मास्क नाही - प्रवेश नाही’ या अभियानाचे स्टीकर्स, बॅनर्स व्यापाऱ्यांना वितरित करण्यात आले. दरम्यान, आनंदोत्सवानंतर असोसिएशनच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे, आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांची भेट घेऊन त्यांना धन्यवाद दिले.
चौकट
व्यापाऱ्यांना मदतीसाठी पाठपुरावा
व्यापार सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे धन्यवाद मानतो. तीन महिन्यांच्या लॉकडाऊनसह वर्षभरातील निर्बंधामुळे अडचणीत आलेल्या व्यापाऱ्यांना मदतीसाठी सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे ललित गांधी यांनी सांगितले.
फोटो (०५०७२०२१-कोल-व्यापारी असोसिएशन) : कोल्हापुरात सोमवारी दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने आनंदोत्सव साजरा केला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांना माणिक पाटील-चुयेकर यांनी पेढा भरविला. यावेळी शेजारी अन्य संचालक, व्यापारी उपस्थित होते.
050721\05kol_4_05072021_5.jpg
फोटो (०५०७२०२१-कोल-व्यापारी असोसिएशन) : कोल्हापुरात सोमवारी दुकाने सुरू झाल्याने राजारामपुरी व्यापारी असोसिएशनने आनंदोत्सव साजरा केला. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष ललित गांधी यांना माणिक पाटील-चुयेकर यांनी पेढा भरविला. यावेळी शेजारी अन्य संचालक, व्यापारी उपस्थित होते.