बांधकाम क्षेत्रात सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर युनियन उल्लेखनीय कार्य करेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:23+5:302021-02-06T04:42:23+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सावरवाडी : बांधकाम क्षेत्रात विविध तंत्रज्ञान विकसित होत असून, नव्या बदलत्या युगात सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर युनियन उल्लेखनीय ...

The Centering Contractors Union will do a remarkable job in the construction sector | बांधकाम क्षेत्रात सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर युनियन उल्लेखनीय कार्य करेल

बांधकाम क्षेत्रात सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर युनियन उल्लेखनीय कार्य करेल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सावरवाडी : बांधकाम क्षेत्रात विविध तंत्रज्ञान विकसित होत असून, नव्या बदलत्या युगात सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर युनियन उल्लेखनीय कार्य करेल, असा विश्वास वैद्यकीय अधिकारी डॉ. मधुरा मोरे यांनी व्यक्त केला.

बीडशेड (ता. करवीर) येथील ज्ञानविज्ञान विद्यालयाच्या प्रांगणात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्री सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर युनियनच्या उद्धाटन समारंभात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. विद्याधर शिरोलीकर होते. यावेळी डॉ. सागर मोरे, डॉ. शैलेश पाटील, राजू कांबळे, सर्जेराव कराळे, कृष्णात पौंडकर, योगिता पाटील, तंबाखू व्यसनमुक्त चळवळीचे संस्थापक एकनाथ कुंभार, लक्ष्मण देसाई, रोहन भावके यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संतोष पाटील यांनी केले तर रवींद्र कांबळे यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला करवीर तालुक्यातून ४०० सेंट्रिंग कॉन्ट्रॅक्टर उपस्थित होते.

०४ सावरवाडी सेंट्रिंग कामगार युनियन

( फोटो ओळ= बीडशेड (ता. करवीर) येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या सह्याद्री सेट्रिंग कॉन्ट्रॅक्टर युनियनचे डॉ. मधुरा मोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी संतोष पाटील, एकनाथ कुंभार, डॉ. सागर मोरे, डॉ. नीलेश पाटील, राजू कांबळे, लक्ष्मण देसाई व मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The Centering Contractors Union will do a remarkable job in the construction sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.