‘सीईटी’नंतरच अकरावीची केंद्रीय प्रवेश प्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:19 AM2021-07-17T04:19:56+5:302021-07-17T04:19:56+5:30
दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी असणार आहे. त्यासाठी शंभर गुणांचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा पेपर असणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी दोन ...
दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित सीईटी असणार आहे. त्यासाठी शंभर गुणांचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा पेपर असणार आहे. ही परीक्षा देण्यासाठी दोन तासांची वेळ विद्यार्थ्यांना दिली जाणार आहे. सीईटी देण्याची विद्यार्थ्यांवर सक्ती असणार नाही. सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ज्या जागा शिल्लक राहतील, त्यावर सीईटी न दिलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. कोल्हापूर शहरातील ३५ महाविद्यालयांतील अकरावी प्रवेशासाठी सन २००८-०९ पासून केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील शासकीय आणि खासगी तंत्रनिकेतनमधील (पॉलिटेक्निक) दहावीनंतरच्या पदविका अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी सध्या ऑनलाइन प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्ह्यातील बारा शासकीय आणि ३९ अशासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधील (आयटीआय) ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरू झाली. त्याचे सविस्तर वेळापत्रक लवकरच जाहीर होणार आहे.
आकडेवारी दृष्टिक्षेपात
दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेले विद्यार्थी : ५५०८८
जिल्ह्यातील महाविद्यालये : १५०
अकरावी प्रवेशाच्या जिल्ह्यातील जागा : ३५०००
शहरातील महाविद्यालये : ३५
अकरावी प्रवेशाच्या शहरातील जागा : १४६८०
कला (इंग्रजी) : १२०
कला (मराठी) : ३६००
वाणिज्य (इंग्रजी) : १६००
वाणिज्य (मराठी) : ३३६०
विज्ञान : ६०००
प्रतिक्रिया
सीईटी परीक्षा झाल्यानंतर शहरात केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. त्याबाबतच्या शासन आदेशाची आम्ही प्रतीक्षेत आहोत.
-सुभाष चौगुले, सहाय्यक शिक्षण संचालक