केेंद्र सरकारकडून सहकार मोडीत : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:24 AM2020-12-31T04:24:23+5:302020-12-31T04:24:23+5:30

कोल्हापूर : सहकाराचा वटवृक्ष करून सामान्य माणसांच्या जीवनात विकासाची पहाट आणण्याचे काम सहकाराने केले. मात्र, अलीकडे केंद्र सरकारच्या चुकीच्या ...

Central government breaks cooperation: Satej Patil | केेंद्र सरकारकडून सहकार मोडीत : सतेज पाटील

केेंद्र सरकारकडून सहकार मोडीत : सतेज पाटील

Next

कोल्हापूर : सहकाराचा वटवृक्ष करून सामान्य माणसांच्या जीवनात विकासाची पहाट आणण्याचे काम सहकाराने केले. मात्र, अलीकडे केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे सहकार मोडीत निघत असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती गृहतारण संस्थेच्या शाहूपुरी येथील दुसऱ्या शाखेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. मंत्री पाटील म्हणाले, केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांतील ८ लाख कोटी थकबाकीदारांना मदतीचे धोरण घेतले. मात्र, सहकारी संस्थांकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. काेरोनामुळे सगळीकडेच आर्थिक कोंडी झाली आहे. त्यातून सावरण्यासाठी सगळ्यांनीच प्रयत्न केले पाहिजेत.

काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आमदार पी. एन. पाटील, आमदार प्रा. जयंत आसगावकर, आमदार चंद्रकांत जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कांबळे यांनी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बजरंग पाटील, करवीरच्या सभापती आश्विनी धोत्रे, प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे, भरत रसाळे, रवीकुमार पाटील आदी उपस्थित हाेते.

फोटो ओळी : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती गृहतारण संस्थेच्या शाहूपुरी येथील दुसऱ्या शाखेचे उद्घाटन पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार पी. एन. पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार जयंत आसगावकर आदी उपस्थित होते. (फोटो-३०१२२०२०-कोल-गृहतारण)

Web Title: Central government breaks cooperation: Satej Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.