साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ, खासदार धनंजय महाडिकांच्या मागणीनंतर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2022 01:35 PM2022-07-08T13:35:11+5:302022-07-08T13:55:43+5:30

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत.

Central government extends sugar exports till July 20, decision after Dhananjay Mahadik's demand | साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ, खासदार धनंजय महाडिकांच्या मागणीनंतर निर्णय

साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ, खासदार धनंजय महाडिकांच्या मागणीनंतर निर्णय

googlenewsNext

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखर निर्यातीला २० जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे. खासदार धनंजय महाडिक यांनी बुधवारीच केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियूष गोयल यांची भेट घेऊन याबाबत मागणी केली होती. त्याची केंद्र सरकारने तातडीने दखल घेत केवळ २४ तासांत ही मुदतवाढ दिल्यामुळे साखर उद्योगाला दिलासा मिळाला.

देशभरात यंदा विक्रमी साखर उत्पादन झाले. येणाऱ्या गळीत हंगामातही मोठ्या प्रमाणात साखर उत्पादित होणार आहे. त्यामुळे केंद्र सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन तातडीने साखर निर्यातीला मुदतवाढ द्यावी अशी मागणी महाडिक यांनी केली होती.

रशिया आणि युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने साखर निर्यातीवर निर्बंध घातले आहेत. या संदर्भातील चर्चेत महाडिक यांनी साखर उद्योग समोरील अडचणी मांडल्या. विशेषतः साखरेचे बंपर उत्पादन झाल्याच्या पार्श्वभूमीवर निर्यात आणि स्थानिक बाजारातील दर नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याची गरज, कोरोना संकट आणि देशांतर्गत बाजारातील गरज ओळखून केंद्र सरकारनं साखर निर्यातीवर घातलेल्या निर्बंधांचा फेरविचार, साखर कारखान्यांकडे दीर्घकाळ साखर पडून राहिल्यास साखरेचा दर्जा खालावण्याचा धोकाही असे मुद्दे मांडले होते.


केंद्र सरकारने ६ जूनपर्यंत साखर निर्यात करण्यासाठी परवानगी दिली होती. परंतु पाऊस, बंदरामधील अडचणी यामुळे देशभरात ८ लाख टन साखर पडून आहे. कंत्राटदार निश्चित करण्यात आले आहेत. पुरवठा झाला नाही तर त्याचा भविष्यात विपरित परिणाम झाला असता. परंतू खासदार धनंजय महाडिक यांच्या मागणीला केंद्र सरकारने तातडीने प्रतिसाद देऊन मुदतवाढ दिल्याने साखर उद्योगाला दिलासा मिळाला. - पी. जी. मेढे, साखर उद्योगातील तज्ज्ञ

Read in English

Web Title: Central government extends sugar exports till July 20, decision after Dhananjay Mahadik's demand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.