केंद्र सरकारने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली : पी. एन. पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:28 AM2021-06-09T04:28:44+5:302021-06-09T04:28:44+5:30
कोल्हापूर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने इंधनासह जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करून सामान्य माणसांसह अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याची टीका आमदार पी. ...
कोल्हापूर : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने इंधनासह जीवनावश्यक वस्तूंची भाववाढ करून सामान्य माणसांसह अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केल्याची टीका आमदार पी. एन. पाटील यांनी केली.
वडणगे (ता. करवीर) येथे कॉंग्रेसच्या वतीने पेट्रोलियम पदार्थ व इंधन दरवाढीच्या निषेधार्थ आयोजित निदर्शने करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी केंद्र सरकारविरोधात घोषणा देण्यात आल्या. याप्रसंगी करवीर पंचायत समितीचे माजी सभापती बी. एच. पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शंकरराव पाटील, केवलसिंह रजपूत, रवींद्र पाटील, एम. जी. पाटील, सुरेश पाटील, एम. बी. कीडगावकर, सचिन चौगले, दत्ता पाटील, जयसिंग पाटील, पंडित नलवडे, धनाजी चौगले, बाजीराव लाड, विश्वास कदम, आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : पेट्रोल, डिझेल दरवाढीविरोधात वडणगे (ता. करवीर) येथे काॅंग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आमदार पी. एन. पाटील, बी. एच. पाटील, सचिन चौगले, शंकरराव पाटील, आदी उपस्थित होते. (फोटो-०८०६२०२१-कोल-कॉग्रेस)