केद्र सरकारने लस देताना राजकारण करू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:24 AM2021-04-10T04:24:05+5:302021-04-10T04:24:05+5:30

कागल : ब्राझील, अमेरिकेपाठोपाठ कोरोना संसर्गात भारताचा नंबर लागतो. त्यामध्येही महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. म्हणून केंद्राने भेदाभेद ...

The central government should not do politics while vaccinating | केद्र सरकारने लस देताना राजकारण करू नये

केद्र सरकारने लस देताना राजकारण करू नये

Next

कागल : ब्राझील, अमेरिकेपाठोपाठ कोरोना संसर्गात भारताचा नंबर लागतो. त्यामध्येही महाराष्ट्रातील मृत्यूचे प्रमाण जास्त आहे. म्हणून केंद्राने भेदाभेद व राजकारण न करता रुग्णांच्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिली पाहिजे, अशी मागणी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज केली. कागल तालुका कोरोना आढावा बैठकीत ते बोलत होते. डी.आर. माने महाविद्यालयाच्या पंटागणात ही बैठक पार पडली.

मंत्री म्हणाले, केंद्र सरकारने २५ वर्षांवरील सर्वांनाच लस उपलब्ध करून द्यावी व ही लस बाजारात कुठेही उपलब्ध झाली पाहिजे. कोरोना संसर्गाचा कहर वाढतच असल्यामुळे या परिस्थितीशी लढण्यासाठी जय्यत तयारी ठेवू या. कोरोना संसर्गाशी लढताना व लसीकरण मोहिमेत कोणतीही अडचण उद्भवल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधा, मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे. ग्रामसमित्या व प्रभाग समित्यांनी सज्ज राहावे, असे आवाहनही मंत्री मुश्रीफ यांनी केले.

बैठकीला तहसीलदार श्रीमती शिल्पा ठोकडे, गटविकास अधिकारी सुशील संसारे, कागल ग्रामीण रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. सुनीता पाटील, कागलचे मुख्याधिकारी पंडित पाटील, मुरगूडचे मुख्याधिकारी संजय गायकवाड, कागल कोविड केअर सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजित शिंदे, कागलचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मुरगूडचे पोलीस उपनिरीक्षक विकास बडवे, सहायक गटविकास अधिकारी अप्पासाहेब माळी, कागलचे नगर अभियंता सुनील माळी, मुरगूड ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. पल्लवी तारळकर आदी अधिकारी उपस्थित होते.

कामगार खाते- निष्ठेचे फळ

मुश्रीफ म्हणाले की, ग्रामविकास खाते माझ्याकडे असतानाही मला कामगार मंत्रिपदाचा कार्यभार मिळाला. एखाद्या नेत्यावर आणि पक्षावर जर असीम निष्ठा असेल आणि त्यांच्यावर जर आपण जीव ओतून निस्सीम प्रेम केले, तसेच संपूर्ण आयुष्य पणाला लावून जर गोरगरीब जनतेची सेवा केली, उद्देश नि:स्पृह आणि प्रामाणिक असेल, तर त्या कष्टाचे फळ किती गोड असते, याचीच ही प्रचीती आहे.

फोटोओळी

कागल : ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना कामगारमंत्री म्हणून अतिरिक्त कार्यभार दिल्याबद्दल त्यांचा कागल तालुक्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

Web Title: The central government should not do politics while vaccinating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.