केंद्रीय आरोग्य समितीमुळे अर्धे शटरही बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:17 AM2021-07-16T04:17:47+5:302021-07-16T04:17:47+5:30

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना आजाराच्या रुग्णवाढीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य समिती आल्यामुळे अर्धे शटर उघडून सुरू ...

The Central Health Committee also closed half the shutters | केंद्रीय आरोग्य समितीमुळे अर्धे शटरही बंद

केंद्रीय आरोग्य समितीमुळे अर्धे शटरही बंद

Next

कोल्हापूर : शहर आणि जिल्ह्यातील कोरोना आजाराच्या रुग्णवाढीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य समिती आल्यामुळे अर्धे शटर उघडून सुरू असलेला व्यापार गुरुवारी बंद करण्यात आला. यामुळे व्यापाऱ्यांत प्रचंड असंतोष निर्माण झाला. आज, शुक्रवारी पुन्हा दुकाने सुरू करण्यावर व्यापारी ठाम आहेत.

कोरोना आजार नियंत्रणात आलेला नाही, याची कारणे विविध पातळ्यांवर शोधून उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच भाग म्हणून केंद्रीय आरोग्य समितीचा दौरा होता. दौऱ्यामुळे शहरातील लक्ष्मीपुरी, शाहूपुरी, बिंदू चौक, राजारामपुरी, महाद्वार रोड, शिवाजी रोड, सुभाष रोड, आदी परिसरांतील दुकानांची अर्धी शटरही बंद करण्यात आली.

सरसकट दुकाने सुरू करण्यास परवानगी मिळावी, अशी व्यापाऱ्यांची मागणी आहे; पण सरकारने याकडे दुर्लक्ष केले आहे. यामुळे नाइलाजास्तव दुकानदारांनी अर्धे शटर उघडून व्यापार सुरू केला आहे; पण दिवसभर केंद्रीय आरोग्य समिती शहरात असल्याने महापालिका आणि पोलीस प्रशासनाने व्यापाऱ्यांना पूर्णपणे शटर बंद करण्यास भाग पाडले. शटर उघडू नये, यासाठी दिवसभर पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला. शहरातील दसरा चौक, शिवाजी चौक, बिंदू चौक, कसबा बावडा, आदी प्रमुख रस्त्यांवर पोलीस, महापालिकेचे कर्मचारी वाहनधारकांना अडवून मास्क परिधान केल्याची खात्री करीत होते. याशिवाय वाहन चालविण्याच्या परवान्याची विचारणा करीत होते. परवाना नसलेल्यांवर आणि मास्क परिधान न केलेल्यांवर दंडात्मक कारवाई केली जात होती. अर्धे शटरही बंद करण्यास भाग पाडल्याने सर्वच व्यापाऱ्यांत असंतोष निर्माण झाला आहे. कितीही पोलीस बंदोबस्त लावला तरी आता दुकाने पूर्णपणे बंद करायची नाहीत, अशी व्यापाऱ्यांची भूमिका आहे.

कोट

सरसकट दुकाने सुरू करण्यासंबंधी परवानगी मिळण्यासाठी सरकारी पातळीवर पाठपुरावा सुरू आहे. शहरातील पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याने दुकाने सुरू करण्यासंंबंधी सरकार सकारात्मक निर्णय घेईल, अशी अपेक्षा आहे.

संजय शेटे,

अध्यक्ष, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स

फोटो : १५०७२०२१-कोल- दुकाने बंद

कोल्हापुरातील महाद्वार रोडवरील दुकानांचे अर्धे शटरही गुरुवारी बंद करण्यात आले. फोटो : आदित्य वेल्हाळ

Web Title: The Central Health Committee also closed half the shutters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.