अतिवृष्टी व पुराच्या नुकसानीचा केंद्रीय पथकाकडून आढावा; पुण्यात बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2020 04:23 AM2020-12-24T04:23:27+5:302020-12-24T04:23:27+5:30

कोल्हापूर : औरंगाबाद व पुणे विभागात माहे जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधित अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा ...

Central team reviews flood and flood damage; Meeting in Pune | अतिवृष्टी व पुराच्या नुकसानीचा केंद्रीय पथकाकडून आढावा; पुण्यात बैठक

अतिवृष्टी व पुराच्या नुकसानीचा केंद्रीय पथकाकडून आढावा; पुण्यात बैठक

Next

कोल्हापूर : औरंगाबाद व पुणे विभागात माहे जून ते ऑक्टोबर २०२० या कालावधित अतिवृष्टी व पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीबाबतचा आढावा केंद्रीय पथकाने पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बुधवारी घेतला.

यावेळी आंतरमंत्रालयीन केंद्रीय पथकाचे प्रमुख रमेश कुमार, ग्रामविकास विभागाचे उपसचिव यशपाल, केंद्रीय वित्त विभागाचे सल्लागार आर. बी. कौल, कृषी मंत्रालयाचे संचालक आर. पी. सिंग, रस्ते वाहतूक व महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता तुषार व्यास, अधीक्षक अभियंता एम. एस. सहारे, उपसचिव सुभाष उमराणीकर, अतिरिक्त आयुक्त डॉ. अनिल रामोड, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.

पथकप्रमुख रमेश कुमार म्हणाले, या विभागात सोयाबीन, उडीद, तूर, कापूस, बाजरी ही पिके आणि पालेभाज्या, फळे तसेच रस्ते, वीज, घरे या पायाभूत सुविधांवर परिणाम झाला आहे. या नुकसानीपोटी केंद्राकडून अधिकाधिक मदत मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला जाईल. आंतरजिल्हा समन्वय ठेवून नुकसानीचा अहवाल तयार करण्याबाबत जिल्हास्तरीय कार्यशाळा घ्याव्यात, तसेच केंद्र सरकारच्या लोककल्याणकारी योजना नागरिकांपर्यंत पोहोचवताना त्यांचा वापर कसा करावा, याबाबत ग्रामसभेत माहिती द्यावी, असेही ते म्हणाले.

--

इंदुमती गणेश

Web Title: Central team reviews flood and flood damage; Meeting in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.