कोल्हापूर जिल्हा बँकेचे ‘सीईओ’ ए. बी. माने राज्य बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक, रिझर्व्ह बँकेची शिफारस 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2023 12:49 PM2023-07-01T12:49:25+5:302023-07-01T12:49:43+5:30

जिल्हा बँकांच्या अधिकाऱ्यांमधून मुख्य सरव्यवस्थापकपदी निवड होणारे डॉ. माने हे पहिलेच अधिकारी आहेत

CEO of Kolhapur District Bank A. B. Mane Rajya Bank Chief General Manager | कोल्हापूर जिल्हा बँकेचे ‘सीईओ’ ए. बी. माने राज्य बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक, रिझर्व्ह बँकेची शिफारस 

कोल्हापूर जिल्हा बँकेचे ‘सीईओ’ ए. बी. माने राज्य बँकेचे मुख्य सरव्यवस्थापक, रिझर्व्ह बँकेची शिफारस 

googlenewsNext

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांची महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य सरव्यस्थापकपदी नियुक्ती झाली. जिल्हा बँकांच्या अधिकाऱ्यांमधून मुख्य सरव्यवस्थापकपदी निवड होणारे डॉ. माने हे पहिलेच अधिकारी आहेत. रिझर्व्ह बँक व नाबार्डच्या तज्ज्ञ अधिकाऱ्यांच्या पॅनेलने मुलाखती घेऊन डॉ. माने यांची नियुक्ती केली.

रिझर्व्ह बँकेने बँकिंग क्षेत्रातील संशोधन व प्रशिक्षणासाठी स्थापन केलेल्या पुणे येथील राष्ट्रीय बँकिंग प्रबंधन संस्थेमध्ये त्यांनी संशोधन अधिकारी म्हणून काम केले. गुजरातमधील अहमदाबाद येथील व्यावसायिकता विकास संस्थेमध्ये त्यांनी फॅकल्टी म्हणूनही काम केले आहे.

गेल्या २५ वर्षांत जिल्हा बँकेत कृषी अधिकारी, बीडीएस विभागामध्ये प्रकल्प अधिकारी, सीएमए सेलचे उपव्यवस्थापक, तसेच अकाउंट्स बँकिंग, शेती कर्जे, प्रशासन, सीएमए सेल, वसुली, ऑडिट, माहिती तंत्रज्ञान या विभागांचे व्यवस्थापक अशा विविध विभागांत वरिष्ठ पदांवर काम केले. २०१४ मध्ये प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी व २०१८ पासून नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून केले. ३१ मार्च २०२३ सेवानिवृत्त झाल्यानंतरही बँकेने त्यांना दोन वर्षांची मुदतवाढ दिली होती.

प्रभारी ‘सीईओ’पदी जी. एम. शिंदे

डॉ. माने हे राज्य बँकेत गेल्याने त्यांच्या ठिकाणी प्रशासन व बोर्ड विभागाचे व्यवस्थापक जी. एम. शिंदे यांच्याकडे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात आली.

आमदार हसन मुश्रीफ हे १९९७ बँकेचे अध्यक्ष असताना बँकेत लेखी व तोंडी परीक्षा दिली होती. त्यावेळी गुणवत्तेनुसार त्यांनी व संचालक मंडळाने मला बँकेच्या सेवेमध्ये सामावून घेतले. त्यांनी संधी दिल्यानेच आज शिखर बँकेमध्ये जाता आले. - डॉ. ए. बी. माने
 

Web Title: CEO of Kolhapur District Bank A. B. Mane Rajya Bank Chief General Manager

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.