विकासकामांसाठी ‘सीईओं’ आक्रमक

By admin | Published: April 17, 2017 12:47 AM2017-04-17T00:47:28+5:302017-04-17T00:47:28+5:30

आर्थिक वर्षाच्या प्रारंभीच झाडाझडती : बैठकीत अधिकाऱ्यांना कामाची दिशा ठरवून दिली

'CEOs' aggressive for development works | विकासकामांसाठी ‘सीईओं’ आक्रमक

विकासकामांसाठी ‘सीईओं’ आक्रमक

Next



कोल्हापूर : आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना पुढील कामांची दिशा ठरवून दिली. राजर्षी शाहू सभागृहात तब्बल तीन तास चाललेल्या या बैठकीत त्यांनी काही विभागांची झाडाझडतीही घेतली.
आठवड्यातून किमान तीन वेळा डॉ. खेमनार हे जिल्हा परिषदेतील विभागप्रमुखांचा आढावा घेतात. महिन्यातून एकदा बाराही गटविकास अधिकाऱ्यांचा आढावा घेतला जातो. मात्र शनिवारी (दि. १५) बोलावलेल्या बैठकीला सर्व विभागप्रमुख, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत विभागाचे विस्तार अधिकारी, महिला आणि बालकल्याण विभागाचे अधिकारी यांची संयुक्त बैठक डॉ. खेमनार यांनी घेतली.
अनेक विभागांचे काम चांगले चालले आहे; परंतु ते अधिक चांगले होण्यासाठी अधिकाऱ्यांनी अधिक योगदान देण्याची गरज व्यक्त करतानाच ज्या ज्या योजनेत कमतरता जाणवते, त्यासाठी आत्तापासूनच तयारी करण्याच्या सूचना दिल्या.

Web Title: 'CEOs' aggressive for development works

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.