जिल्हा परिषदेत ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांवर ‘सीईओं’ची नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 04:29 AM2021-08-14T04:29:36+5:302021-08-14T04:29:36+5:30

जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांत स्थानांतरणाच्या बदल्या झालेल्या नाहीत. अनेक कर्मचारी सहा, सात वर्षे एकाच ठिकाणी काम करत आहेत. ...

CEOs keep an eye on the employees stationed in the Zilla Parishad | जिल्हा परिषदेत ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांवर ‘सीईओं’ची नजर

जिल्हा परिषदेत ठाण मांडलेल्या कर्मचाऱ्यांवर ‘सीईओं’ची नजर

Next

जिल्हा परिषदेत गेल्या दोन वर्षांत स्थानांतरणाच्या बदल्या झालेल्या नाहीत. अनेक कर्मचारी सहा, सात वर्षे एकाच ठिकाणी काम करत आहेत. पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांशी सख्य असणाऱ्या यातील काहींची याआधीही बदली झाली; परंतु पुन्हा ‘वजन’ वापरून मुख्यालयात येण्यामध्ये काहीजण यशस्वी झाले आहेत.

प्रत्येक विभागात शिपायापासून ते लिपिकापर्यंत आणि स्वीय सहायकापासून ते कक्ष अधिकाऱ्यापर्यंत असे काहीजण आहेत. आपापल्या गावात दूधसंस्था, सेवा संस्था आणि पतसंस्थांच्या माध्यमातूनही राजकीय वजन बाळगणारे काहीजण असून त्याचाही फायदा त्यांना यामध्ये होत असतो. अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्यांची चव्हाण यांनी माहिती मागवल्याने ते काय निर्णय घेतात याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Web Title: CEOs keep an eye on the employees stationed in the Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.