ऐन गणेशोत्सवात कडधान्य कडाडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2017 05:21 PM2017-08-27T17:21:13+5:302017-08-27T17:33:51+5:30
कोल्हापूर : ऐन गणेशोत्सवात कडधान्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तुरडाळ, हरभरा डाळीच्या दरात किलो मागे दहा रूपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना दरवाढीची झळ बसली आहे. नारळाबरोबरच खोबºयाच्या दरातही वाढ झाली असून भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर आहेत.
कोल्हापूर : ऐन गणेशोत्सवात कडधान्याच्या दरात कमालीची वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तुरडाळ, हरभरा डाळीच्या दरात किलो मागे दहा रूपयांची वाढ झाल्याने ग्राहकांना दरवाढीची झळ बसली आहे. नारळाबरोबरच खोबºयाच्या दरातही वाढ झाली असून भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर आहेत.
गेले वर्षभर डाळींच्या दरात घसरण होत गेली, पण गत आठवड्याच्या तुलनेत कडधान्याच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात तुरडाळ, हरभरा डाळ ऐंशी रूपयांवर पोहचली आहे. गेले आठवड्यापेक्षा किलो मागे दहा रूपयांची वाढ झाली आहे. शाबूच्या दरातही किलो मागे पाच रूपयांची वाढ झाली असून सरकी तेलही भडकले आहे.
ऐन गणेशोत्सवात नारळाच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात पंधरा रूपये नारळ झाला आहे. नारळाचे दर वाढत असल्याने खोबºयाच्या दरातही मोठी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात खोबरे शंभर हून १४० रूपयांपर्यंत पोहचले आहे.
श्रावणा पाठोपाठ आलेल्या गणेशोत्सवाने भाजीपाल्याचे दर चढे राहतील असा अंदाज होता. पण मध्यंतरी पावसाने दिलेल्या उघडीपीमुळे भाजीपाल्याच्या आवकेत वाढ झाली. सध्या मार्केट मध्ये भाज्यांची रेलचेल झाल्याने दरात चढउतार दिसत आहे. कोबी, टोमॅटो, बिनीस च्या दरात थोडी वाढ झाली असली तरी वांगी, ढब्बू, गवार, ओला वाटाणा, कारली, भेंडी, वरणा, वाल, प्लॉवर या प्रमुख भाज्यांच्या दरात घसरण झाली आहे.
कोथंबीरची आवक वाढली असली तरी मागणी वाढली आहे. परिणामी दरात वाढ झाली असून घाऊक बाजारात दहा रूपये पेंढी पर्यंत दर राहिला आहे. गौरी पूजनामु ळे मेथी, पालक, पोकळा व शेपू या भाज्यांची आवक वाढू लागली आहे.
मेथी व शेपूची आवक मोठ्या प्रमाणात असून रोज मेथीची पंधरा हजार पेंढी तर शेपू सात हजार पेंढी आवक होत असून घाऊक बाजारात सध्या सात रूपये पेंढी दर आहे. फळ मार्केट मध्ये आवक हळूहळू वाढू लागली असून मोसंबी, चिक्कू, सफरचंद, डाळींब, सिताफळाची आवक वाढू लागली आहे.
कांदा घसरला
कांद्याची आवक स्थिर असली तरी मागणी थोडी कमी झाली आहे. त्यामुळे दरात घसरण झाली असून घाऊक बाजारात सरासरी १७ रूपयांपर्यत कांदा राहिला आहे. बटाटा व लसणाचे दर मात्र स्थिर आहेत.