गर्भाशयाचे आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:01 AM2019-04-11T00:01:59+5:302019-04-11T00:02:04+5:30

डॉ. भारती अभ्यंकर ढी’५्रू कल्ला’ेंं३ङ्म१८ ऊ्र२ीं२ी - पिशवीची सूज असे सामान्यपणे ओळखला जाणारा महिलांमधील आजार! यामध्ये पिशवीच्या तोंडाची सूज ...

Cervical illness | गर्भाशयाचे आजार

गर्भाशयाचे आजार

googlenewsNext

डॉ. भारती अभ्यंकर
ढी’५्रू कल्ला’ेंं३ङ्म१८ ऊ्र२ीं२ी - पिशवीची सूज असे सामान्यपणे ओळखला जाणारा महिलांमधील आजार! यामध्ये पिशवीच्या तोंडाची सूज (उी१५्रू्र३्र२), गर्भनलिकेची सूज (रं’स्र्रल्लॅ्र३्र२), गर्भाशयाच्या अस्तराची सूज (एल्लङ्मिेी३१्र३्र२) आणि पोटातील आवरणाची सूज (ढी१्रङ्मल्ल्र३्र२) यांचा समावेश होऊ शकतो.
हा आजार मुख्यत: संभोगाद्वारे जंतूसंसर्गामुळे होतो. याची प्रमुख लक्षणे पुढीलप्रमाणे दिसू शकतात : १) ओटीपोटात दुखणे. २) पाठ, कंबर दुखणे. ३) अयोग्य प्रकारचा रक्तस्राव. ४) जास्त प्रमाणात अंगावरून पांढरा स्राव जाणे. ५) लघवी वेदनादायी होते. ६) संभोगाच्या वेळी ओटीपोटात खूप दुखते. ७) काही वेळा ताप येणे, उलटी, मळमळ होणे यासारखी लक्षणे सुद्ध दिसतात.
वरीलपैकी एक किंवा त्यापेक्षा जास्त लक्षणे आढळल्यास ताबडतोब डॉ.चा सल्ला घ्यावा.
हा आजार वेळीच ओळखला गेला नाही किंवा त्यावर उपचार केले गेले नाहीत, तर त्याचे पर्यवसान वंध्यत्वामधे होऊ शकते. गर्भनलिका जर या आजारामुळे खराब झाल्या तर अंडे रुजण्याची क्रिया मंदावून नळीमध्ये गर्भधारणा होते आणि जिवावरचे दुखणे ओढवू शक ते.
डॉक्टर पेशंटला तपासून म्हणजे तिचे पोट तपासणे तसेच गर्भपिशवीची अंतर्गत तपासणी करून याची तीव्रता समजते. याशिवाय १) रक्त तपासणी - रक्तातील पांढऱ्या पेशींचे प्रमाण. ऌकश्/र८स्रँ्र’्र२ ची बाधा आहे का हे पाहावे. २) अंगावरील स्रावाची तपासणी. ३) रक्त, लघवी तपासणे. ४) सोनोग्राफी - यामध्ये गर्भनलिका व गर्भाशयामध्ये जर गाठी झाल्या असतील, पोटात पाणी जमा झाले असेल तर समजू शकते.
गर्भनळीत गर्भ राहिला असेल तर त्याचे निदान सोनोग्राफीमध्ये होते. अशावेळी दुर्बिणीद्वारे तातडीची शस्रक्रिया केली जाते व जीवघेण्या अवस्थेपासून पेशंट वाचविला जातो. बऱ्याच वेळा अपेंडिक्सची सूजसुद्धा अशाप्रकारे लक्षणे दाखवते. मात्र, यामध्ये पाळीच्या तक्रारी नसतात. अंगावरून स्राव जाणेसुद्धा आढळत नाही.
आजाराच्या गंभीरतेनुसार त्यावर उपचार केले जातात. सौम्य प्रकारचा आजार असेल किंवा नुकतीच सुरुवात झालेली असेल तर पेशंटला अँटिबायोटिक्सचा (अल्ल३्रु्रङ्म३्रू२) कोर्स दिला जातो. अर्थात पेशंटची वारंवार तपासणी करणे गरजेचे असते. जेणेकरून औषधांना रिस्पॉन्स मिळतो आहे ना, हे पाहणे गरजेचे असते. यासारख्या संभोगाद्वारे पसरणाºया व्याधीमध्ये साथीदार किंवा पतीस ट्रीटमेंट देणे खूप गरजेचे असते. अन्यथा, त्या स्त्रीला वारंवार या आजाराला सामोरे जावे लागते. शिवाय पुरुषालासुद्धा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे जोडीने उपाय करणे गरजेचे ठरते.
हा आजार जर पुढच्या स्टेजपर्यंत गेला असेल म्हणजे तोंडाने दिलेल्या औषधाने काही फरक पडत नसेल तर रुग्णांना हॉस्पिटलमध्ये भरती करणे गरजेचे असते. अशावेळी शिरेमध्ये अँटिबायोटिक्स द्यावी लागतात. रुग्णाच्या तापाचे नियंत्रण करणेसुद्धा खूप आवश्यक असते. हे उपाय केले नाहीत तर इन्फे क्शन पोटात पसरण्याची शक्यता असते व तो पेशंट ढरीस्र३्र२ीे्रू २ँङ्मू‘ मध्ये जाऊन मृत्युमुखी पडू शकतो.
बºयाच वेळा शरीराची प्रतिकारशक्ती काम करते व हे इन्फेक्शन रोखण्याचा प्रयत्न शरीर करते. अशावेळी गर्भनलिका व बीजकोष यामध्ये हे सामावून या दोन्हीची गाठ बनते याला ढी’५्रू अुूी२२ म्हणतात. अशावेळी आॅपरेशनद्वारा यातील पू काढून टाकला जातो.
ढ१ी५ील्ल३ङ्मल्ल ्र२ ं’६ं८२ ुी३३ी१ ३ँील्ल ू४१ी! त्यामुळे हा आजार होऊ नये याची काळजी प्रत्येकीने घेतली पाहिजे. त्यासाठी पुढील गोष्टी उपयोगी ठरतात.
१) एकापेक्षा अनेक पुरुषांबरोबर संबंध टाळावेत. २) शरीरसंबंधावेळी लॅटेक्सयुक्त कंडोम वापरावेत. ३) योनीमार्गात डूशचा वापर करणे टाळावे. ४) शौचास जाऊन आल्यावर शौचमार्ग पाण्याने स्वच्छ धुवावा व कोरडा ठेवावा. ५) योनीमार्ग किंवा त्याजवळील जागेत खाज सुटल्यास त्यावर उपाय करावेत. ती जागा खाजवू नये. त्यामुळे तेथे जंतू प्रादुर्भाव लगेच होतो. ६) गर्भनिरोधक म्हणून कॉपर टी वापरत असाल तर वरचेवर तपासणी करणे गरजेचे आहे.
कॉपर टी वापरण्याचा कालावधी ठरलेला असतो. काही तीन वर्षांसाठी तर काही पाच वर्षांसाठी वापरू शकतो, परंतु दरवर्षी त्याचे चेकअप करणे गरजेचे असते.
या गोष्टींचे योग्य निदान व उपचार न झाल्यास त्याचे पर्यवसान अयोग्य ठिकाणी गर्भ राहणे, बीजकोषात ‘पू’युक्त गाठी होणे, वंध्यत्व येणे, गर्भनलिका पाण्याने फुगणे, यासारख्या व्याधी होतात. याची वेळेत तपासणी, वेळेत उपचार झाल्यास पिशवी काढणे ही मोठी शस्त्रक्रिया टाळली जाऊ शकते.
(लेखिका कोल्हापुरातील स्त्री रोग व
प्रसूतिशास्त्र तज्ज्ञ आहेत.)

Web Title: Cervical illness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.