‘सीईटी’त दर्शन शहा ९९.९५ टक्क्यांसह विवेकानंद महाविद्यालयात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 06:17 PM2019-06-04T18:17:50+5:302019-06-04T18:20:10+5:30

कोल्हापूर : ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेत विवेकानंद महाविद्यालयात दर्शन शहा याने ‘पीसीएम’ गटात दर्शन हेमंत शहा याने ९९.९५ टक्के गुणांसह मंगळवारी ...

In 'CET', Darshan Shah topped the Vivekananda College with 99.95% | ‘सीईटी’त दर्शन शहा ९९.९५ टक्क्यांसह विवेकानंद महाविद्यालयात अव्वल

‘सीईटी’त दर्शन शहा ९९.९५ टक्क्यांसह विवेकानंद महाविद्यालयात अव्वल

Next
ठळक मुद्दे’त दर्शन शहा ९९.९५ टक्क्यांसह विवेकानंद महाविद्यालयात अव्वल‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेत शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी यश

कोल्हापूर : ‘एमएचटी-सीईटी’ परीक्षेत विवेकानंद महाविद्यालयात दर्शन शहा याने ‘पीसीएम’ गटात दर्शन हेमंत शहा याने ९९.९५ टक्के गुणांसह मंगळवारी प्रथम क्रमांक पटकविला. वृषभ पाटील याने ९९.९३ टक्क्यांसह द्वितीय, तर यश तानाजी कुंडले याने ९९.७५ टक्क्यांसह तृतीय क्रमांक पटकविला.

‘पीसीबी’ गटात वृषभ पाटील हा ९९.५१ टक्क्यांसह प्रथम, स्नेहल कदम हिने ९९. २३ टक्क्यांसह द्वितीय आणि श्रीया उपाध्ये हिने ९९.१५ टक्क्यांसह तृतीय क्रमांक मिळविला आहे.

‘पीसीएम’ गटात ६० पेक्षा अधिक, तर ‘पीसीबी’ गटात ४५ हून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. ‘पीसीएम’ आणि ‘पीसीबी’ गटाचे मिळून एकत्र शंभरहून अधिक विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे.

या विद्यार्थ्यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे, संस्थेच्या सचिव प्राचार्या शुभांगी गावडे, विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. एस वाय होनगेकर यांनी अभिनंदन केले.

 

Web Title: In 'CET', Darshan Shah topped the Vivekananda College with 99.95%

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.