सीईटीचे ‘गणित’ होते अवघड

By admin | Published: May 6, 2016 12:44 AM2016-05-06T00:44:39+5:302016-05-06T01:10:48+5:30

परीक्षा सुरळीत पार : १३ हजार विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा

CET's mathematics was difficult | सीईटीचे ‘गणित’ होते अवघड

सीईटीचे ‘गणित’ होते अवघड

Next

कोल्हापूर : आरोग्य विज्ञान, अभियांत्रिकी आणि औषधनिर्माणशास्त्र अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी यंदाची सामायिक प्रवेश परीक्षा (एमएच-सीईटी) गुरुवारी झाली. कोल्हापूर जिल्ह्यातील १३ हजार ९७४ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी ही परीक्षा दिली. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्राचा पेपर सोपा; पण गणिताचा पेपर जरा अवघड होता, अशा प्रतिक्रिया पेपरनंतर विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. ही परीक्षा शांततेत पार पडली.
राज्याच्या सामायिक परीक्षा विभागातर्फे ‘एमएच-सीईटी’ परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील १४ हजार २७९ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी नोंदणी केली होती. शहरातील प्रायव्हेट हायस्कूल, गर्ल्स हायस्कूल, उषाराजे हायस्कूल, डी. एड्. कॉलेज, कमला कॉलेज, विवेकानंद ज्युनिअर व सीनिअर कॉलेज, न्यू मॉडेल स्कूलची एक व दोन क्रमांकाची इमारत, शहाजी कॉलेज, महावीर महाविद्यालय, आदी ३४ केंद्रांवर गुरुवारी परीक्षा झाली. सकाळी नऊ वाजल्यापासून परीक्षा केंद्रांवर विद्यार्थी आणि पालकांनी गर्दी केली. परीक्षेपूर्वी बैठक व्यवस्था पाहण्यासाठी धावपळ उडाली. सकाळी दहा ते साडेअकरा या वेळेत भौतिकशास्त्र व रसायनशास्त्राचा पहिला पेपर झाला. यानंतर दुपारी साडेबारा ते दीड या वेळेत जीवशास्त्राचा पेपर झाला. त्यानंतर तिसरा गणित या विषयाचा पेपर दुपारी तीन ते साडेचार या वेळेत झाला. बारावीच्या अभ्यासक्रमावर आधारित हे पेपर होते. यातील पहिला आणि दुसरा पेपर सोपा; पण गणिताचा पेपर जरा अवघड असल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या. गैरप्रकार होऊ नये यासाठी प्रत्येक परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त होता. जिल्हा प्रशासनाचे ११०० अधिकारी, कर्मचारी परीक्षेच्या नियोजनात कार्यरत होते. (प्रतिनिधी)


अवधूत पाटीलची संधी हुकली; सीईटीला मुकला
देऊळवाडी (ता. भुदरगड) येथील अवधूत ईश्वरा पाटीलची वैद्यकीय प्रवेशासाठी आवश्यक असलेली एम.एच.-सीईटी ही परीक्षा मणक्याच्या त्रासामुळे संधी हुकली. दरम्यान, गेल्या आठवड्यात राजारामपुरी, दुसऱ्या गल्लीतील एका इमारतीच्या जिन्यावरून पडून तो जखमी झाला होता. सध्या त्यांच्यावर सीपीआरमध्ये उपचार सुरू आहेत. अवधूत पाटील याला दोन आठवड्यांपूर्वी लक्ष्मीपुरी पोलिसांनी दहा घरफोड्या व मोबाईल चोरीप्रकरणी कारवाई करून अटक केली होती. सध्या अवधूत पाटीलचा तपास राजारामपुरी पोलिस करीत आहेत. दुसऱ्या एका गुन्ह्यात त्याला अटक करण्यात आली होती. त्यामुळे त्याला राजारामपुरी पोलिस तपासासाठी घेऊन परत येत असताना जिन्यावरून तो खाली पडला. त्यामध्ये अवधूतच्या मणक्याला दणका बसला. त्याला सीपीआरमध्ये उपचारांसाठीदाखल केले आहे.

पेपर नोंदणी केलेलेपरीक्षा दिलेले
पहिला पेपर१४२७९१३९७४
दुसरा पेपर७५००७३०६
तिसरा पेपर१००९२९८५२

Web Title: CET's mathematics was difficult

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.