पंचगंगा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. माधुरी कुलकर्णी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:33 AM2021-05-14T10:33:32+5:302021-05-14T10:36:57+5:30

Banking Sector Kolhapur : कोल्हापूर येथील श्री पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. माधुरी कुलकर्णी, तर उपाध्यक्षपदी भालचंद्र साळोखे यांची संचालक मंडळाच्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपनिबंधक (सहकारी संस्था) पी. एल. जगताप होते.

As the Chairman of Panchganga Bank, Dr. Madhuri Kulkarni | पंचगंगा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. माधुरी कुलकर्णी

पंचगंगा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. माधुरी कुलकर्णी

googlenewsNext
ठळक मुद्देपंचगंगा बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. माधुरी कुलकर्णी उपाध्यक्षपदी भालचंद्र साळोखे : बिनविरोध निवड

कोल्हापूर : येथील श्री पंचगंगा नागरी सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. माधुरी कुलकर्णी, तर उपाध्यक्षपदी भालचंद्र साळोखे यांची संचालक मंडळाच्या सभेत बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी उपनिबंधक (सहकारी संस्था) पी. एल. जगताप होते.

बँकेने सुवर्णमहोत्सवी वर्षात पदार्पण केले असून डिजिटायझेशनसह अनेक क्षेत्रात यश मिळविले आहे. ज्येष्ठांच्या अनुभव, मार्गदर्शनाचा बँकेच्या प्रगतीकरिता नक्कीच उपयोग होईल, असे प्रतिपादन नूतन अध्यक्ष डॉ. माधुरी कुलकर्णी यांनी केले. बँकेच्या व्यवसायाचे उद्दिष्ट सर्व संचालक, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही नूतन उपाध्यक्ष साळोखे यांनी दिली.

मावळते अध्यक्ष राजाराम शिपुगडे, उपाध्यक्ष राहुल भोसले यांनी सर्व संचालक, कर्मचाऱ्यांच्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. या सभेस संचालक विकास परांजपे, चंद्रशेखर धर्माधिकारी, उपेंद्र सांगवडेकर, संदीप पाटील, वृषाली बंकापुरे, नंदकुमार दिवटे, ॲॅड. विवेक शुक्ल, केशव गोवेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक फडणीस, महाव्यवस्थापक सुशील कुलकर्णी उपस्थित होते.
 

Web Title: As the Chairman of Panchganga Bank, Dr. Madhuri Kulkarni

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.