Kolhapur: जोतिबाची चैत्र यात्रा 'या' दिवशी होणार, नियोजन आढावा बैठक संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 06:12 PM2024-02-22T18:12:17+5:302024-02-22T18:12:41+5:30
अमोल शिंगे जोतिबा : संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा २३ ...
अमोल शिंगे
जोतिबा : संपूर्ण महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री क्षेत्र जोतिबा डोंगर येथील चैत्र पौर्णिमेची यात्रा २३ एप्रिल रोजी संपन्न होणार आहे. या अनुषंगाने आज जोतिबा डोंगर येथे जिल्हा प्रशासनाची यात्रा काळात भाविकांना आणि ग्रामस्थांना सेवा सुविधा पुरवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या नियोजनासाठी आढावा बैठक घेण्यात आली.
बैठकीत जोतिबा मंदिरातील गाभाऱ्यात गुलाल खोबरे उधळण्यास मज्जाव करण्याच्या चर्चेवर प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. याचबरोबर जोतिबा डोंगरावर प्लास्टिक बंदी करण्याच्या दृष्टिकोनातून जोतिबा ग्रामपंचायतीला पन्हाळा तहसीलदार सौ माधवी शिंदे - जाधव यांनी विशेष सूचना केल्या. नियोजनावर चर्चा झाल्यावर जिल्हा प्रशासनातील प्रत्येक विभागाच्या नियोजनाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
या नियोजन बैठकीवेळी सरपंच राधा बुणे, शाहूवाडी उपविभागीय पोलिस अधिकारी अप्पासाहेब पवार, कोडोली पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास कोडक, देवस्थान समितीचे प्रभारी अधिकारी जयकुमार तिवले, ग्रामपंचायत सदस्य सुनिल नवाळे, मनोज कदम, जिल्हा प्रशासनातील सर्व विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.