नाधवडे येथील चैत्र यात्रा रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:25 AM2021-04-24T04:25:33+5:302021-04-24T04:25:33+5:30

गारगोटी : नाधवडे (ता. भुदरगड) येथील ग्रामदैवत जोतिर्लिंग देवाचा सोमवार, २६ एप्रिल रोजी होणारा चैत्र उत्सव कोरोना प्रादुर्भावाच्या ...

Chaitra Yatra at Nadhavade canceled | नाधवडे येथील चैत्र यात्रा रद्द

नाधवडे येथील चैत्र यात्रा रद्द

Next

गारगोटी :

नाधवडे (ता. भुदरगड) येथील ग्रामदैवत जोतिर्लिंग देवाचा सोमवार, २६ एप्रिल रोजी होणारा चैत्र उत्सव कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर रद्द करण्याचा निर्णय ग्रामस्थ आणि देवस्थान समितीच्या वतीने घेण्यात आला आहे. या यात्रेसाठी पुणे, मुंबईसह विविध शहरांत नोकरी-व्यवसायानिमित्त स्थायिक ग्रामस्थ हजेरी लावत असतात. तसेच गावातील माहेरवाशिणी व पै-पाहुणे, आप्तेष्ट यांची उपस्थिती असते. यंदा उत्सवानिमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आलेले आहेत. फक्त देवाचा अभिषेक व अन्य धार्मिक विधी कोरोनाच्या नियमांचे काटेकोर पालन करत मोजक्याच मानकऱ्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार आहेत. तेव्हा संबंधितांनी व भाविकांनी याची दखल घ्यावी, असे आवाहन देवस्थान उपसमिती, ग्रामपंचायत व पोलीस पाटील यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Web Title: Chaitra Yatra at Nadhavade canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.