राष्ट्रीय समाज पक्षाचा आज चक्काजाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:16 AM2021-07-04T04:16:45+5:302021-07-04T04:16:45+5:30
कोल्हापूर : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राज्यभरात ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक ...
कोल्हापूर : राष्ट्रीय समाज पक्षाच्यावतीने राज्यभरात ओबीसी राजकीय आरक्षण रद्द केल्याच्या निषेधार्थ राज्यव्यापी चक्काजाम आंदोलन पुकारले आहे. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापूर जिल्हा शाखेच्यावतीने तावडे हाॅटेल येथे आज, रविवारी सकाळी ११ वाजता चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती पक्षाचे जिल्हाअध्यक्ष डाॅ. संदेश कचरे यांनी दिली.
डाॅक्टर म्हणजे दु:ख मुक्तीचा मार्ग
कोल्हापूर : एका श्वासाचे आयुष्य केवळ डाॅक्टारामुळे दीर्घायुषी होते. कारण डाॅक्टर हा दु:ख मुक्तीचा मार्ग आहे, असे मत सामाजिक कार्यकर्ते मोहन मिणचेकर यांनी व्यक्त केले. निर्मिती विचारमंच व धम्म भवन चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने ‘डाॅक्टर डे’निमित्त सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या डाॅक्टरांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते. या वेळी डाॅ. नरेंद्र पाटील, डाॅ. राजकुमार बागल, डाॅ. संतोष कांबळे, डाॅ. गोविंद चंदनशिवे आदींचा सत्कार करण्यात आला. या वेळी अनिल म्हमाने, मंदार पाटील, विजय कोरे आदी उपस्थित होते.
स्वातंत्र्यसेनानी म. दुं. श्रेष्ठी यांची जयंती साजरी
कोल्हापूर : ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी व कोल्हापूर जिल्हा खादी ग्रामोद्योग संघाचे माजी अध्यक्ष स्वर्गीय महादेव दुंडाप्पा श्रेष्ठी यांची १२६ वी जयंती खादी ग्रामोद्योग संघामध्ये साजरी करण्यात आली. अध्यक्षस्थानी सुंदरराव देसाई होते. या वेळी एस. एस. तुपद, सखाराम सुतार, छायाताई भोसले, गीताताई गुरुव, सविता देसाई, गणेश ओतारी, पंढरी शिंदे, अमोल पाटील, संदीप शिंगे, मिलिंद चौगुले, सीताराम कांबळे आदी उपस्थित होते. सचिन पाटील यांनी आभार मानले.