‘चकोते ग्रुप’चे चकाचक अभियान

By admin | Published: March 25, 2015 12:16 AM2015-03-25T00:16:22+5:302015-03-25T00:42:24+5:30

अण्णासाहेब चकोते यांचा वाढदिवस : ३०० हून अधिक बसस्थानके झाली स्वच्छ

The Chakote campaign of 'Chakote Group' | ‘चकोते ग्रुप’चे चकाचक अभियान

‘चकोते ग्रुप’चे चकाचक अभियान

Next

जयसिंगपूर : चकोते ग्रुप आॅफ इंडस्ट्रिज, गणेश बेकरी नांदणीचे अध्यक्ष अण्णासाहेब चकोते यांच्या ४१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ या उपक्रमामध्ये हजारो नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून अभियान यशस्वी केले. मंगळवारी सकाळी ८ ते १० या वेळेत एकाच वेळी महाराष्ट्रासह सीमाभागातील ३०० बसस्थानकांची स्वच्छता करण्याचा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी अण्णासाहेब चकोते यांच्याबरोबर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनीही स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. चकोते उद्योग समूहातील सर्व कर्मचारी, अधिकारी, वितरक, रिटेलर्स, मित्रपरिवार, तसेच बसस्थानकामधील अधिकारी, कर्मचारी, प्रवासीवर्ग, नागरिकही यामध्ये सहभागी झाले होते. गोळा झालेला कचरा वर्गीकरण करून नष्ट करण्यात आला. आवश्यक त्या ठिकाणी डंपर, ट्रॅक्टर याद्वारे कचरा डेपोमध्ये नेऊन टाकण्यात आला.
कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी, जयसिंगपूर, कागल, मुरगूड, पेठवडगाव, मलकापूर, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, गारगोटी, राधानगरी या बसस्थानकांबरोबरच ग्रामीण भागातील बसस्थानकांची स्वच्छता करण्यात आली. सांगली, सातारा, सोलापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, जालना, परभणी, नांदेड, औरंगाबाद या जिल्ह्यांतील, तसेच कर्नाटक सीमाभागातील बेळगाव, विजापूर, बिदर, गुलबर्गा, बागलकोट या जिल्ह्यांतील ३०० पेक्षा जास्त बसस्थानकांची स्वच्छता केली.
एकाचवेळी ३०० हून अधिक बसस्थानकांची स्वच्छता करण्यासाठी सुमारे १० ते १५ हजार लोकांचा सहभाग हा देशातील पहिलाच अभिनव सामाजिक उपक्रम ठरला आहे. सर्व ठिकाणी स्वच्छतेसाठी झाडू, बकेट, मास्क, टोपी, आदी साहित्य पुरविण्यात आले होते. याबरोबरच स्वयंस्फूर्तीने अनेक बसस्थानकांची रंगरंगोटी केली. अनेक ठिकाणी टँकरद्वारे पाणी, जेसीबी मशीन, ट्रॅक्टर, आदींचा वापर करण्यात आला.
दरम्यान, कोल्हापूर येथील मध्यवर्ती बसस्थानकात सुमारे २५० जणांनी स्वच्छता मोहीम राबविली. या उपक्रमाची सुरुवात चेअरमन अण्णासाहेब चकोते यांच्या हस्ते करण्यात आली. मध्यवर्ती बसस्थानकासह आगाराचीही स्वच्छता करण्यात आली. सुमारे दोन तासांच्या अथक परिश्रमानंतर हा परिसर चकाचक झाला. यावेळी चार ट्रॉली कचरा जमा झाला. गोळा
झालेला कचरा योग्यरित्या वर्गीकरण करून ग्रुपच्यावतीने नष्ट केला.
यामध्ये चकोते यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह चकोते उद्योग समूहातील सर्व कर्मचारी, अधिकारी, वितरक, रिटेलर्स, मित्रपरिवार, मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक बी. पी. नाईक, स्थानक प्रमुख अभय कदम, वाहतूक नियंत्रक दीपक घारगे, डी. आर. साळुंखे, विजय फाळके, रवींद्र कदम, संपत पाटील, प्रेमानंद पेडणेकर, मधुकर कदम, आदींनी सहभाग नोंदवला.


चकोते यांची संकल्पपूर्ती
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘स्वच्छ भारत अभियान’ सुरू केले आहे. याला बळकटी मिळवून देण्याचे कार्य अण्णासाहेब चकोते यांनी पूर्ण करून संकल्पपूर्ती केली. त्यांच्या या अभिनव उपक्रमाची महाराष्ट्रातील अनेक उद्योजकांनी प्रेरणा घ्यावी व या राष्ट्रीय कार्यामध्ये सहभागी होऊन स्वच्छ भारत अभियान यशस्वी करण्यासाठी एक पाऊल पुढे यावे, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त केली गेली.
स्वच्छता अभियानाचा देशातील पहिला सामाजिक अभिनव उपक्रम यशस्वी झाला आहे. या अभियानामध्ये सहभागी होऊन ते मोठ्या प्रमाणात यशस्वी केल्याबद्दल जनतेचे, सर्व बसस्थानकांतील अधिकारी, कर्मचारी, ग्रामपंचायत, महानगरपालिका पदाधिकारी, नगरपालिका, अधिकारी, कर्मचारी यांच्या सहकार्याबद्दल चकोते ग्रुप आभारी आहे.
- अण्णासाहेब चकोते
अध्यक्ष, चकोते ग्रुप आॅफ इंडस्ट्रिज.

Web Title: The Chakote campaign of 'Chakote Group'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.