चलकरंजीत मनसेकडून महावितरण खळ्ळखट्याक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2021 05:14 AM2021-02-20T05:14:19+5:302021-02-20T05:14:19+5:30

एक जण जखमी, नऊ जण ताब्यात फोटो लोकमत न्यूज नेटवर्क इचलकरंजी : थकीत वीज बिलापोटी वीज जोडण्या खंडित केल्याचा ...

Chalkaranjit from MNS to MSEDCL | चलकरंजीत मनसेकडून महावितरण खळ्ळखट्याक

चलकरंजीत मनसेकडून महावितरण खळ्ळखट्याक

Next

एक जण जखमी, नऊ जण ताब्यात

फोटो

लोकमत न्यूज नेटवर्क

इचलकरंजी : थकीत वीज बिलापोटी वीज जोडण्या खंडित केल्याचा जाब विचारत मनसेच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी स्टेशन रोडवरील महावितरणच्या मुख्य कार्यालयात घुसून तोडफोड केली. यामध्ये एक कॅशिअर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. याप्रकरणी नऊ जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लॉकडाऊनमधील वीज बिल माफ व्हावे, यासाठी मनसेसह विविध संघटनांनी मागणी केली होती. त्यावर निर्णय न झाल्यामुळे वर्षभरापासून अनेक वीज ग्राहकांची बिले थकीत आहेत. दरम्यान, महावितरणकडून आता थकीत असलेल्या घरगुती व औद्योगिक वीज बिलांसाठी वीज जोडणी तोडण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्याला सर्वच स्तरांतून विरोध दर्शविला जात आहे. तरीही पोलीस बंदोबस्तात वसुली सुरू आहे. याअंतर्गत लक्ष्मी औद्योगिक वसाहतीमधील मनसेच्या एका पदाधिकाऱ्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्याचा जाब विचारण्यासाठी मनसेचे काही कार्यकर्ते महावितरणच्या कार्यालयात गेले. तेथे आंदोलक व अधिकारी यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यामुळे संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयावर हल्ला चढवला. मुख्य प्रवेशद्वारासह इमारतीच्या खिडक्या फोडल्या. कॅश काउंटरसमोरील काच फोडली. त्यामुळे कार्यालयात काचा व विटांचा खच पडला होता. ही माहिती समजताच अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी, निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून आंदोलकांतील नऊ जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून माहिती घेण्याचे तसेच अन्य आंदोलकांची धरपकड करण्याचे काम सुरू होते. ताब्यात घेतलेल्यांवर सरकारी नोकरावर हल्ला करणे, सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे, सरकारी कार्यालयात दहशत निर्माण करणे, आदी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोटो ओळी १९०२२०२१-आयसीएच-०५

१९०२२०२१-आयसीएच-०६

१९०२२०२१-आयसीएच-०७ इचलकरंजीत मनसेकडून महावितरण कार्यालयात तोडफोड करण्यात आली.

१९०२२०२१-आयसीएच-०८

मनसेकडून महावितरण कार्यालयाची तोडफोड झाल्यानंतर घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, पोलीस उपाधीक्षक बाबूराव महामुनी, निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांनी पाहणी केली.

(छाया - उत्तम पाटील)

Web Title: Chalkaranjit from MNS to MSEDCL

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.