शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे संस्थांपुढे आव्हान

By Admin | Published: January 3, 2017 12:37 AM2017-01-03T00:37:37+5:302017-01-03T00:37:37+5:30

माणिकराव साळुंखे : वारणानगर येथे विनय कोरे प्रतिष्ठानच्या पुरस्कारांचे वितरण; सत्कार समारंभ

Challenge against institutions to increase the quality of education | शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे संस्थांपुढे आव्हान

शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे संस्थांपुढे आव्हान

googlenewsNext

वारणानगर : देशासमोरील शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे हे आजच्या शिक्षण संस्थांसमोरील मोठे आव्हान आहे. यासाठी शिक्षक, विद्यार्थी व युवा पिढीने पुढे येणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन सिंबायोसिस विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. माणिकराव साळुंखे यांनी येथे बोलताना केले.
विनय कोरे गौरव प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या शिक्षण भूषण व गुणवंत विद्यार्थी पुरस्कार २०१६ या गौरव सोहळ्यात कुलगुरू डॉ. साळुंखे बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी मंत्री विनय कोरे होते.
विनय कोरे म्हणाले, प्रत्येकाने चांगला विचार, दृष्टिकोन समोर ठेवून प्रगतीच्या दिशेने जावे.
जी. डी. पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. यावेळी शामराव पाटील, जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश पाटील, गटशिक्षणाधिकारी एम. के. चव्हाण, डॉ. उज्ज्वला चौगुले, प्राचार्य डॉ. सुरेखा शहापुरे, डॉ. एस. व्ही. आणेकर, डॉ. जॉन डिसोझा, समन्वयक प्रा. किरण पाटील, विकास चौगुले उपस्थित होते. (वार्ताहर)


विनय कोरे गुणवंत विद्यार्थी पुरस्कार
धनश्री पांडुरंग सिद (वारणानगर, पारगाव)
अनुजा महेंद्र शिंदे (मलकापूर)
शंतनू शरद संकपाळ (तळसंदे)
राहुल उत्तम पाटील (सागाव)
राष्ट्रीय खेळाडू
रमा पोतनीस - राष्ट्रीय हॉकी पंच
ऐश्वर्या राजेश चव्हाण - राष्ट्रीय खेळाडू


विनय कोरे शिक्षण भूषण पुरस्कारांचे मानकरी
पन्हाळा तालुका - प्राथमिक गट - संजय गणपती माने (मानेवाडी), भारती प्रभाकर चोपडे (कोडोली), माध्यमिक - प्रकाश रामचंद्र पाटील (आवळी).
शाहूवाडी तालुका - प्राथमिक - रत्नसंध्या नेताजी पाटील (वारुळ), विक्रम शामराव पाटील (साळशी), माध्यमिक - आनंदराज यशवंत पाटील (विरळे).
हातकणंगले : प्राथमिक - बाबू दत्तात्रय केसरकर (कुंभवडे), माध्यमिक - राहुल तातोबा कुंभार (घुणकी).
वाळवा : प्राथमिक - प्रशांत बाळकृष्ण पाटील (कामेरी), माध्यमिक - सुरेश कुमार कागवाडे (ऐतवडे बुद्रुक).
‘एमपीएससी’ गुणवंत विद्यार्थी
शशांक कदम (मांगले), सोनल कोंडसकर (पारगाव), भारत चौगुले (हरपवडे), बाळकृष्ण हसबनीस (शिराळा), समित जाधव (बहिरेवाडी), दुर्गा सुतार (कोडोली), विजयकुमार जाधव (बहिरेवाडी), प्रणाली खोचरे (कसबा बावडा), नंदकुमार भोसले (म्हाळुंगे), अमित मुळीक (शिराळा), उज्ज्वला मगदूम (शित्तूर वारुण).

Web Title: Challenge against institutions to increase the quality of education

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.