‘घर तिथे शौचालय’ पालिकेपुढे आव्हान

By admin | Published: March 4, 2016 09:33 PM2016-03-04T21:33:01+5:302016-03-05T00:11:12+5:30

जयसिंगपूर पालिका : नगरसेवकांबरोबर प्रशासनाचा सहभाग महत्त्वाचा

Challenge to the 'home toilets there.' | ‘घर तिथे शौचालय’ पालिकेपुढे आव्हान

‘घर तिथे शौचालय’ पालिकेपुढे आव्हान

Next

संदीप बावचे -- जयसिंगपूर -हागणदारीमुक्तअभियानानंतर आता ‘घर तिथे शौचालय’ उभारण्याचा संकल्प जयसिंगपूर पालिकेने केला आहे़ नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी ५० लाख रुपयांची तरतूदही करण्यात आली आहे़ मात्र, घर तिथे शौचालय हे अभियान यशस्वी करण्यासाठी नगरसेवकांबरोबर पालिका प्रशासनाचा सहभाग तितकाच महत्त्वाचा ठरणार आहे़ यासाठी जनजागृतीदेखील महत्त्वाची असून, तरच ‘निर्मलशहर’ हे अभियान यशस्वी ठरणार आहे़
सांस्कृतिक चळवळ व शिक्षणाची पंढरी म्हणून शहराची ओळख आहे़ केंद्राच्या स्वच्छ भारत अभियानाच्या धरतीवर हागणदारी मुक्तशहर हा संकल्प पालिकेने हाती घेऊन तो पूर्ण केला आहे़ यासाठी गूड मॉर्निंग पथक, विविध पक्ष, सामाजिक संघटना व पालिका प्रशासनाचे सहकार्य मिळाले़ शौचालय बांधणाऱ्यांना शासनाचे १२ हजार व पालिकेकडून ५ हजार असे एकूण १७ हजारांचे अनुदान देऊन पहिल्या टप्प्यात ३३९ कुटुंबांना शौचालयाची सुविधा पुरविली आहे़ हागणदारीमुक्त शहर म्हणून शासनाकडून पालिकेचा गौरवही झाला. शासनाकडून सुमारे दीड कोटी रुपयांचा निधी पालिकेला मिळणार आहे़ पहिला टप्प्यात तीस टक्के निधी मिळणार असून, उर्वरित निधी अंतिम सर्वेक्षणानंतर मिळणार असल्याने स्वच्छ भारत अभियान यशस्वी ठेवण्यासाठी पालिकेची जबाबदारी वाढली आहे़

शताब्दी वर्ष : ग्रीन सिटी बनविण्याचे ध्येय
निर्मल शहरासाठी पालिकेने हाती घेतलेली संकल्पना येणाऱ्या वर्षभरात निश्चितच पूर्णत्वाला येईल, अशी अपेक्षा आहे़
याचबरोबर शहराला ग्रीन सिटी बनविण्याचे ध्येय असून, शहराचे यंदाचे शताब्दी वर्ष आहे़ यामुळे निश्चितच विकासात्मक कामे पूर्ण होतील, असा विश्वास पक्षप्रतोद संजय पाटील-यड्रावकर यांनी व्यक्त केला़


हागणदारीमुक्त अभियानानंतर पालिकेने आता ‘घर तिथे शौचालय’ उभारण्याचा संकल्प केला आहे़ २५ जानेवारीला झालेल्या विशेष सभेत घर तिथे शौचालय उभारण्याचा संकल्प नगरसेवकांबरोबर पालिका प्रशासनाने हाती घेतला आहे़ अजूनही शौचालय नसणाऱ्या कुटुंबांना अनुदानाची तरतूद करून देण्यासाठी नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे़

निर्मल शहरासाठी पालिकेने घेतलेल्या निर्णयाचे शहरवासीयांतून स्वागत होत आहे़ हे अभियान यशस्वी करण्यासाठी खरी गरज आहे ती जनजागृतीची. यासाठी प्रभागवार नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे़ शिवाय नगरसेवकांबरोबर पालिका प्रशासनाची सहकार्याची भूमिकाही शहराला दिशा देणार आहे़

Web Title: Challenge to the 'home toilets there.'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.