काँग्रेसच्या वर्चस्वाला विरोधकांचे आव्हान

By admin | Published: January 12, 2017 01:08 AM2017-01-12T01:08:03+5:302017-01-12T01:08:03+5:30

कोल्हापूर जि.प.चा रणसंग्राम : भाजप प्रथमच आव्हान देण्याच्या भूमिकेत; राष्ट्रवादीसाठी लढत प्रतिष्ठेची

Challenge of Opposition of Congress | काँग्रेसच्या वर्चस्वाला विरोधकांचे आव्हान

काँग्रेसच्या वर्चस्वाला विरोधकांचे आव्हान

Next

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात आपल्या कामाने वेगळा ठसा उमटविला आहे. पाच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत राष्ट्रीय काँग्रेस आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेने गुण्यागोविंदाने सत्तासंसार केल्याचे चित्र दिसले. काँग्रेस सत्तेत असली तरी ती एकसंघ नसल्याचेही दिसले आणि गटातटात एकमेकांना पदे मिळू नयेत, यासाठीही खेळलेल्या राजकारणाचे दर्शन झाले.
कधी नव्हे ते पहिल्यांदा जि.प. साठी दोन्ही काँग्रेस विरोधकांना आशावादी चित्र दिसते. भाजपने दोन्ही काँग्रेसकडील मंडळींना भाजपमध्ये घेण्याचा सपाटा लावला, सत्ता संपादन करण्यासाठी प्रयत्न चालू ठेवले. भाजप, जनसुराज्य किंवा ताराराणी आघाडीत या, असे सांगत सत्तेच्या गणितासाठी तीनही पक्षांची मंडळी प्रयत्नशील आहेत. काँग्रेसची अवस्था बिकट असून, राष्ट्रवादीलाही खिंडित गाठण्यासाठी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विडा उचलला. भाजपा आघाडी सक्रिय असताना स्वाभिमानी संघटना आणि शिवसेनेच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष आहे. सध्या या दोन्ही पक्षांना निवडणुकीनंतर महत्त्व येण्याची शक्यता आहे. एकूणच पक्षापेक्षा स्थानिक आघाड्यावर भर दिला जाईल, असे चित्र दिसून येत आहे.

सतेज पाटील, महाडिक यांच्यातील संघर्ष पेटला
सतेज पाटील आणि महादेवराव महाडिक यांच्यातील संघर्ष पेटण्यासाठी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कारणीभूत ठरले आहे. गेल्या पाच वर्षांत पहिली दोन वर्षे यशोदा कोळी अध्यक्ष होत्या. त्यानंतर आपले चिरंजीव अमल यांना अध्यक्ष करा, म्हणून महाडिक यांनी जोरदार प्रयत्न केले. परंतु, सतेज पाटील यांनी त्यांचे प्रयत्न हाणून पाडत सदाशिवराव मंडलिक आणि पतंगराव कदम यांच्यात चर्चा घडवून संजय मंडलिक यांना अध्यक्ष केले. पुन्हा मंडलिक राजीनामा देऊन शिवसेनेत लोकसभेच्या निमित्ताने प्रवेश करते झाले. त्यावेळीही सहा महिन्यांसाठी सतेज पाटील यांनी आपलेच खंदे समर्थक उमेश आपटे यांना अध्यक्ष केले. याचाच परिणाम म्हणून पुढे विधानसभेला महाडिक यांनी सतेज पाटील यांच्याविरोधात अमल यांना उभे करून २१ दिवसांत आमदार करून दाखवले. आधी पेटलेल्या महाडिक-पाटील संघर्षाला अध्यक्षपदामुळे आणखी धार आली, हे वास्तव आहे.


आता अनेकांनी बदलले पक्ष
जरी वरील यादीत अनेकांचा समावेश असला तरी काँग्रेसमधून संजय मंडलिक, परशुराम तावरे बाहेर पडून शिवसेना, भाजपमध्ये गेले आहेत. अर्जुन आबिटकर हे देखील आता काँग्रेसचे चिन्ह घेऊन लढू शकत नाहीत. राष्ट्रवादीचे अरुण इंगवले भाजपमध्ये गेले आहेत. स्वाभिमानीच्या जिल्हा परिषद सदस्य परीट यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
गेल्यावेळी ज्या पक्षातून हे सदस्य निवडून आले, त्यापेक्षा वेगळे पक्ष आणि आघाड्यांतून ते किंवा त्यांच्या पत्नी निवडणूक लढवणार असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.

तीन वर्षांत मिळाले
८0 कोटी रुपये जादा
जिल्हा परिषदेचे वार्षिक अंदाजपत्रक सरासरी ३0 कोटी रुपयांचे आहे. मात्र, गौणखनिजासह शासनाकडून अनेक प्रकारचा निधी जिल्हा परिषदेला येणे होता. तो गेल्या तीन वर्षांत मिळाल्याने जिल्हा परिषदेचे बजेट गेल्या तीन वर्षांत वाढले. त्यामुळे अनेक नावीन्यपूर्ण योजना जिल्हा परिषदेला गेल्या तीन वर्षांत करता आल्या. मात्र, आता शासकीय देणे आल्यामुळे पुन्हा हे बजेट आता ३0 कोटींवरच येणार आहे.


सध्याचे पक्षीय बलाबल
राष्ट्रीय काँग्रेस३१
राष्ट्रवादी काँग्रेस१६
शिवसेना0६
जनसुराज्य0६
स्वाभिमानी0५
शाहूवाडी विकास आघाडी0३
भाजप0१
अपक्ष0१
एकूण६९


स्वच्छता, आरोग्यामध्ये चांगले काम
देशात पाचवा स्वच्छ जिल्हा म्हणून कोल्हापूर जिल्ह्याने क्रमांक पटकावला आहे; तर प्राथमिक आरोग्य केंद्राची कायापालट योजना देखील महाराष्ट्रात अनुकरणीय ठरली आहे. महिला बालकल्याण विभागानेही आपल्या अंगणवाड्यांना आयएसओ मानांकन घेण्यास सुरुवात केली असून, शिक्षण विभागाने ई-लर्निंगसाठी भरीव तरतूद करून शाळांना साहित्यही वितरित करण्यात आले आहे.


आतापर्यंतचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष
दिनकरराव भाऊसाो यादव१२/८/१९६२ ते १८/८/१९७२
बाळासाहेब शंकरराव माने३0/१0/१९७२ ते १५/२/१९७७
दिनकरराव विठ्ठलराव मुद्राळे२५/५/१९७७ ते १९/६/१९७९
बाबासो यशवंत पाटील२0/६/१९७९ ते १९/६/१९८0
शंकरराव बाळा पाटील, कौलवकर२८/७/१९८0 ते ६/४/१९८३
शामराव दत्तात्रय पाटील, कोडोलीकर७/६/१९८३ ते ७/३/१९८६
शंकरराव बाळा पाटील, कौलवकर४/४/१९८६ ते ३0/६/१९९0
प्रकाश आनंदराव पाटील२१/३/१९९२ ते २/८/१९९६
बाबूराव सत्त्याप्पा हजारे१६/८/१९९६ ते २0/३/१९९७
नंदाताई शेलाजी पोळ२१/३/१९९७ ते २0/३/१९९८
पुष्पमाला मोहनराव जाधव२१/३/१९९८ ते २0/३/१९९९
रामचंद्र आनंदराव गुरव२१/३/१९९९ ते २0/३/२00२
आण्णासाहेब शिवा नवणे२१/३/२00२ ते१७/२/२00५
दादासाहेब चवगोंडा पाटील१८/२/२00५ ते २0/३/२00७
नानासाो फक्कड गाठ२१/३/२00७ ते ३0/११/२00९
यशोदा बाळासाहेब कोळी१/१२/२00९ ते २0/३/२0१२
संजयसिंह सदाशिवराव मंडलिक२१/३/२0१२ ते १२/३/२0१४
हिंदुराव दादू चौगुले (प्रभारी)१३/३/२0१४ ते २/४/२0१४
उमेश मुकुंदराव आपटे३/४/२0१४ ते २0/९/२0१४
विमल पुंडलिक पाटील

Web Title: Challenge of Opposition of Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.