‘हद्दवाढी’च्या चळवळीत चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:30 AM2021-08-17T04:30:06+5:302021-08-17T04:30:06+5:30

कोल्हापूर : हद्दवाढीमुळे शहराचा आणि गावांचा विकास होणार असेल तर या चळवळीत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेईल, असा ...

The Chamber of Commerce will take the lead in the 'Boundary Extension' movement | ‘हद्दवाढी’च्या चळवळीत चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेणार

‘हद्दवाढी’च्या चळवळीत चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेणार

Next

कोल्हापूर : हद्दवाढीमुळे शहराचा आणि गावांचा विकास होणार असेल तर या चळवळीत कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स पुढाकार घेईल, असा विश्वास चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सोमवारी सायंकाळी येथे झालेल्या बैठकीत दिला.

हद्दवाढीसंदर्भात येथील चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात बैठक झाली. त्यावेळी त्यांनी हा विश्वास दिला. चेंबर ऑफ कॉमर्सशी संबंधित सर्व संस्था हद्दवाढीच्या चळवळीत भाग घेतील. ग्रामीण भागातील जनतेत काही गैरसमज आहेत. शहराच्या हद्दीत आपली गावे गेली की पाणीपट्टी वाढणार, घरफाळा वाढणार, ही भीती ग्रामस्थांच्या मनात आहे. ही भीती दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असे शेटे यांनी सांगितले.

हद्दवाढ का पाहिजे आणि हद्दवाढ झाल्यानंतर शहर तसेच ग्रामीण भागातील जनतेला मिळणाऱ्या सुविधा याविषयी क्रिडाईतर्फे पॉवर पाॅइंट प्रेझेंटेशन तयार केले जात असून ग्रामीण जनतेसमोर त्याचे सादरीकरण केले जाणार असल्याचे, क्रिडाईचे प्रकाश देवलापूरकर यांनी सांगितले.

बाबा इंदूलकर यांनी हद्दवाढीबाबत वस्तुस्थिती मांडली. कोणाही विरोधात लढाई न करता चर्चा, संवाद आणि समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोविड व महापूरसारख्या नैसर्गिक आपत्तीमध्ये महापालिका प्रशासनाने खूप चांगल्या सुविधा जनतेला दिल्या, मोठे काम केले; परंतु त्याच वेळी ग्रामीण भागात मात्र नागरिकांना फारशा सुविधा मिळाल्या नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधले. यावेळी शिवाजीराव पोवार, संजय पाटील, धनंजय दुग्गे, दिलीप देसाई, प्रदीप कापडिया, संभाजी पोवार उपस्थित होते.

फोटो क्रमांक - १६०८२०२१-कोल-केएमसी०४

ओळ - कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात सोमवारी चेंबर ऑफ कॉमर्सच्या सभागृहात झालेल्या बैठकीत अध्यक्ष संजय शेटे यांनी मार्गदर्शन केले.

(छाया : नसीर अत्तार)

Web Title: The Chamber of Commerce will take the lead in the 'Boundary Extension' movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.