कोल्हापूर जिल्ह्यांत दोन दिवस पावसाची शक्यता, उष्मा वाढल्याने नागरिक हैराण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2024 11:59 AM2024-05-20T11:59:12+5:302024-05-20T12:19:54+5:30
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. दहा ते पंधरा मिनिटे सरी कोसळल्या. त्यानंतर, आकाश ढगाळ राहिले. ...
कोल्हापूर : कोल्हापूर शहरात रविवारी सायंकाळी पावसाचा शिडकावा झाला. दहा ते पंधरा मिनिटे सरी कोसळल्या. त्यानंतर, आकाश ढगाळ राहिले. आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाची अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आठवडाभर जिल्ह्यात वळीव पाऊस कमी-अधिक प्रमाणात होत आहे. रविवारी सकाळपासून कमालीचा उष्मा जाणवत होता. त्यामुळे सायंकाळी जोरदार पाऊस कोसळणार असेच दिवसभर वातावरण राहिले. दुपारी तीननंतर ढगाळ वातावरण होऊन आकाश गच्च झाले आणि पाऊस सुरू झाला. सुमारे पंधरा मिनिटे एकसारख्या सरी कोसळल्या. त्यानंतर, आकाश ढगाळच राहिले. पाऊस येऊन गेला, तरी वातावरणात उष्मा कमी झाला नव्हता. तो वाढतच गेल्याने रात्री अंगाकडून घामाच्या धारा वाहत होत्या.
आगामी दोन दिवस जिल्ह्यांत वळिवाची हजेरी राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. साधारणत: गुरुवारनंतर आकाश कोरडे राहील, असे सांगण्यात आले.