चंदन तस्करीतील सूत्रधार मिरजेचा?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2017 06:35 PM2017-07-22T18:35:18+5:302017-07-22T18:35:18+5:30
पोलीस तपासाला गती
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि.२२ : चिखली (ता. करवीर) येथील वन विभागाच्या रोपवाटीकेतील पाऊण कोटीच्या चंदनाची तस्करी करणारा मूख सूत्रधार हा मिरजेचा असल्याचे पोलीस तपासात पुढे येत आहे. चंदन चोरीनंतर आठ जणांची ही टोळी शिये येथील एका धाब्यावर जेवण करुन पुढे मार्गस्थ झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांच्या हाती लागले आहे.
चिखलीतील वन विभागाच्या नर्सरीत कर्मचाऱ्यांना बांधून चोरट्यांनी पाऊण कोटीचा दरोडा टाकल्याचे उघडकीस आले होते. चंदन तस्करी आठजण असून ते पुणे-बेंगलोर महामार्गावरील शिये येथील धाब्यावर जेवून करुन पुढे मार्गस्थ झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलीसांच्या हाती लागले आहे.
कर्नाटक-महाराष्ट्रात परवानाधारक चंदनाचे तेल व गंध तयार करणारे कारखाने पोलीसांच्या रडावरवर आहेत. मिरजेतील एका कारखान्याचा मालक संशयाच्या फेऱ्यात असून पोलीस त्याच्यापर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही वर्षापूर्वी कागल येथे अशाच प्रकारे चंदनाची तस्करी मोठ्या प्रमाणावर झाली होती. त्या प्रकरणात या कारखानदारास पोलीसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेची दोन पथके यावर रात्रंदिवस मेहनत घेत आहेत.