Crime News kolhapur: वीस हजाराची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 06:39 PM2022-06-18T18:39:05+5:302022-06-18T18:40:42+5:30

गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी पांडे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती.

Chandgad police sub inspector arrested while accepting bribe of Rs 20,000 | Crime News kolhapur: वीस हजाराची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास अटक

Crime News kolhapur: वीस हजाराची लाच स्वीकारताना पोलीस उपनिरीक्षकास अटक

Next

चंदगड : वडिलांविरुध्द दाखल असलेला गुन्ह्याच्या तपासात मदत करण्यासाठी २० हजाराची लाच घेताना चंदगड पोलीस ठाण्यांतर्गत फाटा पोलीस चौकीतील पोलीस उपनिरीक्षकाला रंगेहाथ पकडले. कोल्हापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, शनिवारी दुपारच्या सुमारास ही कारवाई केली. अमित भागवत पांडे (वय ३४, सध्या रा. पाटणेफाटा, मूळगाव खोतेवाडी, ता. हातकणगंले) असे लाच घेणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.

याबाबतची माहिती अशी की, अमित पांडे गेल्या दोनच महिन्यापूर्वी चंदगड पोलीस स्थानकात हजर झाला होता. तक्रारदार व वडिलांविरुध्द असलेल्या गुन्ह्याच्या तपासात मदत करावी म्हणून पांडे याने तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यामध्ये तडजोड करुन ती रक्कम ४० हजार करण्यात आली.

यातील २० हजाराचा पहिला हप्ता स्वीकारताना आज पांडे यास पाटणे फाटा येथे लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या अधिकाऱ्यांनी रंगेहाथ पकडले. पोलीस उपअधिक्षक आदिनाथ बुधवंत, उप अधीक्षक राजेश बनसोडे, अप्पर पोलीस अधिक्षक सूरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस  निरीक्षक नितीन कुंभार, सुनील घोसाळकर, नवनाथ कदम, संदीप पडवळ, मयूर देसाई व सूरज अपराध यांनी ही कारवाई केली.

Web Title: Chandgad police sub inspector arrested while accepting bribe of Rs 20,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.