चंदगड तालुक्यात शेतकरी गुंतले वैरणीचे साठे सुरक्षिततेच्या कामात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:26 AM2021-04-28T04:26:58+5:302021-04-28T04:26:58+5:30

चंदगड : उंदीर पेटती वात पळवतील. यामुळे गवताच्या गजींना आगी लागून पशुधनाची उपासमार होईल. हे कटू प्रसंग टाळण्यासाठी वैरणीचे ...

In Chandgad taluka, farmers are engaged in security work of fodder stocks | चंदगड तालुक्यात शेतकरी गुंतले वैरणीचे साठे सुरक्षिततेच्या कामात

चंदगड तालुक्यात शेतकरी गुंतले वैरणीचे साठे सुरक्षिततेच्या कामात

Next

चंदगड : उंदीर पेटती वात पळवतील. यामुळे गवताच्या गजींना आगी लागून पशुधनाची उपासमार होईल. हे कटू प्रसंग टाळण्यासाठी वैरणीचे साठे जिवापाड जपा, अशा आशयाची पत्रे छत्रपती शिवाजी महाराजांनी गड-किल्यावरील किल्लेदारांना पाठविल्याचे पुरावे आजही सापडतात. या दूरदृष्टीच्या राजांनी साडेतीनशे वर्षांपूर्वीही वैरण व वृक्षांचे महत्त्व जाणले होते. सद्य:स्थितीत चंदगड तालुक्यात वैरणीचे गगनाला भिडलेले दर पाहता शेतकरी व पशुपालक पशुधनाची वर्षभराची बेगमी सुरक्षित करण्यात मग्न असल्याचे चित्र दिसत आहे.

काही वर्षांपूर्वी एखाद्या टाकाऊ वस्तूला पिंजराची उपमा दिली जायची. मात्र, त्याच एका ट्रॉलीभर पिंजराची किंमत ४ ते ६ हजार रुपयांच्या घरात गेली आहे, तर शाळूच्या एका कडबा पेंडीची किंमत दोन-तीन रुपयांवरून १५ ते २० रुपयांवर गेली आहे. पेंडीचा आकार मात्र पहिल्यापेक्षा निम्मा झाल्याचे शेतकरी सांगतात. शेतकऱ्यांचे नगदी व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. यातूनच मिळणारे शेणखत पिकांसाठी महत्त्वाचे असल्याने वैरणीला सोन्याचा भाव आला आहे. यात पिंजर, कराड, शाळू, मका, आदींचा कडबा याची काडी-काडी जमा करून शेतकरी पावसाळ्यापूर्वी गवत गंजीत सुरक्षित करत आहेत. बऱ्याच ठिकाणी गवत गंजीत पाणी उतरू नये म्हणून प्लास्टिक ताडपत्रीचा वापर वाढला आहे. दुसरीकडे गवत गजींना आगी लावण्याचे खेदजनक प्रकारही घडताना दिसत आहेत. ही मानसिकता बदलण्याची गरज आहे.

-------------------------

* फोटो ओळी : डुक्करवाडीपैकी रामपूर (ता. चंदगड) येथे जनावरांना वर्षभरासाठी बेगमी करून ठेवलेल्या गवताची गंजी रचताना शेतकरी बांधव.

क्रमांक : २७०४२०२१-गड-०७

Web Title: In Chandgad taluka, farmers are engaged in security work of fodder stocks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.