चंदगडच्या शेतीला मिळणार 'फॉरेन'ची झळाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:28 AM2021-07-07T04:28:51+5:302021-07-07T04:28:51+5:30

निंगाप्पा बोकडे चंदगड : परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या शोभीवंत पानांच्या झाडांच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी होत असून त्याला 'फॉरेन'च्या ...

Chandgad's agriculture will get a taste of 'foreign' | चंदगडच्या शेतीला मिळणार 'फॉरेन'ची झळाळी

चंदगडच्या शेतीला मिळणार 'फॉरेन'ची झळाळी

Next

निंगाप्पा बोकडे

चंदगड :

परदेशात मोठ्या प्रमाणात मागणी असणाऱ्या शोभीवंत पानांच्या झाडांच्या लागवडीचा प्रयोग यशस्वी होत असून त्याला 'फॉरेन'च्या बाजारपेठेत लवकरच पाठविण्यात येणार असल्याने चंदगडच्या शेतीला अनोखी झळाळी मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील गुडेवाडी (ता. चंदगड ) गावात शोभीवंत झाडांची लागवड केलेली असून या झाडांच्या पानांना परदेशातून मोठी मागणी आहे. एशियन बँकेचे सल्लागार डॉ. परशराम पाटील यांनी आपल्याच शेतात हा प्रयोग केला असून त्याची केंद्र सरकारच्या कृषी मंत्रालयाने दखल घेतली आहे. तसेच देशातील १८ नावीन्यपूर्ण शेती उद्योगात याचा समावेश केला आहे.

परदेशांमध्ये विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने या शोभीवंत पानांची सजावट केली जाते. त्यामुळे या पानांना मोठ्या प्रमाणात मागणी असते. आपल्या देशातील हवामान याप्रकारच्या वनस्पतींसाठी पोषक आहे. हे लक्षात आल्यावर गुडेवाडी येथील शेतकरी डॉ. परशराम पाटील यांनी आपल्या शेतात १० गुंठ्यामध्ये शोभीवंत पानांच्या झाडांची लागवड केली आहे. या लागवडीमध्ये प्रत्येकी एक एकरला महिना एक ते दीड लाख रुपये उत्पन्न मिळू शकते. सध्या हा प्रयोग यशस्वी होत असल्याचे स्पष्ट होताच केंद्रीय कृषी मंत्रालयाकडूनच याची दखल घेण्यात आली आहे.

भारतीय शेतीला उद्योगाचे स्वरूप देणे आणि शेतकऱ्यांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडणे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न असून त्याची पूर्ती या माध्यमातून होत आहे.

शेतीतील नावीन्याचा शोध घेऊन शेतकऱ्यांना उत्पादन आणि विक्री कौशल्य यांचे प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न एशियन बँक तसेच स्टार्टअप इंडियाचे सल्लागार डॉ. परशराम पाटील सध्या करत आहेत.

चौकट :

शेतीला व्यवहारिक स्वरूप देणार

आपल्या ज्ञानाचा उपयोग देशाबरोबरच माझ्या जन्मभूमीला व्हावा, यासाठी विविध उपक्रम हाती घेतले असून त्यातील शोभीवंत झाडांचा हा एक भाग आहे. चंदगडच्या शेतीला पारंपरिकतेतून बाहेर काढून त्याला व्यावहारिक देण्याचा मानस असल्याचे मत 'लोकमत'शी बोलताना सांगितले.

फोटो ओळी : गुडेवाडी (ता. चंदगड) येथील प्रगतिशील शेतकरी डॉ. परशराम पाटील यांनी केलेली शोभीवंत झाडांची शेती.

क्रमांक : ०५०७२०२१-गड-०६

Web Title: Chandgad's agriculture will get a taste of 'foreign'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.