चंदीगढ, एनसीआर दिल्ली अजिंक्य

By admin | Published: January 28, 2015 11:54 PM2015-01-28T23:54:34+5:302015-01-29T00:17:24+5:30

राष्ट्रीय शूटिंगबॉल स्पर्धा : महाराष्ट्र, हरियाणा उपविजेते

Chandigarh, NCR Delhi, Ajinkya | चंदीगढ, एनसीआर दिल्ली अजिंक्य

चंदीगढ, एनसीआर दिल्ली अजिंक्य

Next

जयसिंगपूर : जयसिंगपूर स्पोर्टस् अकॅडमी व श्रीमती राजमती गतारे चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित राष्ट्रीय पातळीवरील शूटिंगबॉल स्पर्धेत पुरुष गटात चंदीगढ संघाने ओम नमो चषक पटकाविला. तर महिला गटात एनसीआर दिल्ली संघाने राजमती चषक पटकाविला. विजेत्या संघांना उद्योगपती राजेंद्र मालू यांच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले.
येथील आयोध्या मालू क्रीडानगरीत या स्पर्धा पार पडल्या. पुरुष गटातील उपांत्य फेरीत चंदीगढ विरुद्ध पंजाब, उत्तरप्रदेश विरुद्ध महाराष्ट्र यांच्यात सामने झाले. यावेळी चंदीगढने पंजाबवर १५-६, १५-१० अशा, तर महाराष्ट्र संघाने १५-११, १५-१३ अशा गुणफरकाने उत्तरप्रदेशवर मात केली.अंतिम सामना महाराष्ट्र व चंदीगढ यांच्यात अत्यंत अटीतटीचा झाला. पहिला सेट १५-११ अशा गुणफरकाने महाराष्ट्र संघाने जिंकला, तर दुसरा व तिसरा असे सलग दोन सेट चंदीगढ संघाने १५-४ व १५-२ अशा गुणफरकाने मात करीत ओम नमो चषक पटकाविला. मालिकावीर म्हणून चंदीगढ संघाचा सुरेंद्रकुमार बिष्णाई, सामनावीर किताब महाराष्ट्र संघाच्या जयंत खंडागळे, बेस्ट शुटर नवयुवक नांद्रे संघाच्या दीपक खाडे, बेस्ट स्कूपर महाराष्ट्र संघाचा सुशांत पवार, बेस्ट नेटमनचा किमाब चंदीगढ संघाचा सुखदीप याने पटकाविला. स्पर्धेत अरुणकुमार, निट्टू, खाशाबा जाधव, खली यांची खेळी उत्कृष्ठ ठरली.
महिला गटात उपांत्य फेरीत एनसीआर दिल्ली संघाने सांगलीवर मात केली तर हरियाना संघाने कर्नाटक संघावर मात करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
अंतिम सामन्यात एनसीआर दिल्ली संघाने हरियाना संघावर १३-१५, १५-१२, १५-१० अशा गुणफरकाने मात करीत राजमती चषक पटकाविला. महिला गटात मालिकावीर महिला निलीमा कोष्टी, सांगली हिने तर सामानावीर महिला सुखदा हरियाणा, बेस्ट शुटर किताब पूजा एनसीआर दिल्ली यांनी पटकाविला.
बक्षीस वितरणप्रसंगी शितल गतारे, सर्जेराव पवार, शैलेश आडके, राजेंद्र आडके, शेखर हेरेकर, पिंटू कुलकर्णी, अजित पवार, डॉ. अतिक पटेल, शिवाजी सावंत, आर. वाय. पाटील यांच्यासह जयसिंगपूर स्पोर्टस् अकॅडमी व क्रीडा रसिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Chandigarh, NCR Delhi, Ajinkya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.