चांदोली राष्ट्रीय उद्यान उद्यापासुन पर्यटकांसाठी बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 02:20 PM2023-06-14T14:20:38+5:302023-06-14T14:20:53+5:30
सरुड : कोल्हापूर ,सांगली , सातारा जिल्ह्यातील पर्यटकांच्या पर्यटनासाठी पर्वणी ठरलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान १५ जुन पासुन १५ ऑक्टोंबर ...
सरुड : कोल्हापूर ,सांगली , सातारा जिल्ह्यातील पर्यटकांच्या पर्यटनासाठी पर्वणी ठरलेले चांदोली राष्ट्रीय उद्यान १५ जुन पासुन १५ ऑक्टोंबर पर्यंत चार महिने पर्यटनासाठी बंद राहणार असल्याची माहीती चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे वनक्षेत्रपाल नंदकुमार नलवडे यांनी दिली .
अलिकडच्या काळात चांदोली राष्ट्रीय उद्यान पर्यटकांच्या वाढत्या पर्यटनामुळे संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झोतात आले आहे . या उद्यानातील पर्यटनासाठी वनविभागाने बस सेवा सुरु केल्याने या उद्यानास भेट देणाऱ्या पर्यटकांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
गेल्या जानेवारी महिन्या पासुन आजपर्यंत सुमारे पाच हजार पर्यटकांनी या उद्यानास भेट देऊन येथील निसर्गरम्य पर्यटनाचा आनंद लुटल्याची नोंद या विभागाच्या कार्यालयाकडे झाली आहे. सुट्टीमुळे मे महिन्यात सर्वात जास्त पर्यटकांनी भेट दिली.
प्रशासनाच्यावतीने दरवर्षी १५ जुन पासुन हे उद्यान पर्यटकांसाठी बंद ठेवले जाते. पावसाळा संपल्यानंतर १५ ऑक्टोंबर पासून चांदोली राष्ट्रीय उद्यान पुन्हा पर्यटनासाठी खुले केले जाते. विशेषता जानेवारी ते मे या पाच महिन्याच्या कालावधीत या उद्यानामध्ये पर्यटकांची गर्दी असते .