चंद्रकांतदादा चर्चेला या... आम्ही आलोय; राष्ट्रवादीच्या पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांचे कोल्हापुरात ठिय्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 12:27 AM2019-05-14T00:27:00+5:302019-05-14T00:27:06+5:30
कोल्हापूर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ताराराणी चौकात आलोय... दुष्काळावरील चर्चेसाठी या.... असे उघड आव्हान पुणे, उस्मानाबाद, सातारा व सांगली ...
कोल्हापूर : महसूलमंत्री चंद्रकांत पाटील ताराराणी चौकात आलोय... दुष्काळावरील चर्चेसाठी या.... असे उघड आव्हान पुणे, उस्मानाबाद, सातारा व सांगली जिल्'ातील राष्टÑवादीच्या महिला पदाधिकाऱ्यांनी कोल्हापुरात येऊन दिले. तासभर ताराराणी चौकात ठिय्या मारत मंत्री पाटील यांच्यासह भाजप सरकारच्या कारभाराचा पाढाच वाचला.
मंत्री पाटील यांनी चार दिवसांपूर्वी शरद पवार व त्यांच्या पंटरनी दुष्काळाबाबत चर्चेसाठी यावे, असे जाहीर आव्हान दिले होते. त्याचा स्वीकार करत राष्टÑवादीच्या महिला पदाधिकारी सोमवारी ताराराणी चौकात दाखल झाल्या. पुणे जिल्हा महिला राष्टÑवादीच्या अध्यक्षा वैशाली नागवडे म्हणाल्या, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी वापरलेल्या ‘पंटर’ शब्दाचा जाहीर निषेध करतो. आम्ही दुष्काळाचे राजकारण करत नाही, तर संकटात सापडलेल्या शेतकºयांना आधार देण्याचे काम करतो. राष्टÑवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शेतकºयांच्या बांधावर, जनावरांच्या छावणीत जाऊन शेतकºयांना आधार देत आहेत; पण ज्यांची जबाबदारी आहे तेच आम्हाला ‘पंटर’ म्हणतात, आमचे उघड आव्हान आहे, आता चर्चेसाठी ताराराणी चौकात आलोय, हिंमत असेल, तर उद्या मंत्रालयाच्या चौकात चर्चेसाठी या.
मंत्री पाटील यांचे विशेष कार्यकारी अधिकारी बाळासाहेब यादव यांनी ताराराणी चौकात येऊन निवेदन स्वीकारावे, अशी मागणी महिलांनी धरली; पण पोलिसांनी मध्यस्थी करत विश्रामगृहातील कार्यालयात जाऊन निवेदन दिले. यावेळी सक्षणा सलगर, कविता मेत्रे, अर्चना गोरे, लोचन शिवले, वैशाली धगाटे, ज्ञानेश्वर शेळके, विकास खळदकर, हेमंत निंबाळकर, अनिल नागवडे, सीमा पाटोळे, जहिदा मुजावर, नम्रता कांबळे आदी उपस्थित होते.
‘एसीत बसून व्हीसी’
शरद पवार या वयात उन्हातान्हात दुष्काळी भागात फिरत असताना मुख्यमंत्री ‘एसीत’ बसून ‘व्हीसी’ घेत असल्याची टीका वैशाली नागवडे यांनी केली.
घोषणांनी परिसर दणाणून सोडला
‘लावणी नको छावण्या लावा’, ‘दादा आलोय... चर्चेला या’ आदी घोषणांनी महिला पदाधिकाºयांनी ताराराणी चौक दणाणून सोडला.