कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचीची सत्ता : चंद्रकांतदादा पाटील
By admin | Published: March 11, 2017 03:59 PM2017-03-11T15:59:24+5:302017-03-11T15:59:24+5:30
संख्याबळ ४० पर्यत, अध्यक्ष युतीचाच, फक्त औपचारीकता बाकी,
कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेनेचीची सत्ता : चंद्रकांतदादा पाटील
संख्याबळ ४० पर्यत, अध्यक्ष युतीचाच, फक्त औपचारीकता बाकी,
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा परिषदेवर भाजप-शिवसेना मित्रपक्ष आघाडीची सत्ता येईल, त्याबाबत घोषणांची फक्त औपचारिकता बाकी असल्याचा दावा महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केला.
चार राज्यात भाजपला मिळालेल्या यशानंतर कोल्हापूरातील शिवाजी चौकात भाजपतर्फे विजयोत्सव करण्यात आला. याप्रसंगी चंद्रकांतदादा पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापूरातील जिल्हा परिषदेवर सत्ता कोणाची येणार? याबाबत कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे. मंगळवारी अध्यक्षपदाची निवड होणार असल्याने सत्ता स्थापनेसाठी भाजपसह काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही सरसावले आहेत. पण शिवसेनेची भूमिका अद्याप गुलदस्त्यात असल्याने साऱ्यांची उत्सुकता ताणली आहे. याबाबत पाटील म्हणाले, कोल्हापूर जिल्हा परिषदेवर कोणत्याही परिस्थितीत भाजप-शिवसेनेचीच सत्ता स्थापन होण्यास काहीच हरकत नाही, याबाबत वरिष्ठ आणि स्थानिक पातळीवरील नेत्यांशी सविस्तर चर्चा झाली आहे. दोन्ही पक्षाची मने जुळली असल्याने जिल्हा परिषदेवर भाजप-सेनेचा झेंडा फडकण्यास काहीही अडचण नाही. सोमवारी अध्यक्ष निवडीची फक्त औपचारिकता बाकी राहीली आहे. सत्तेसाठी आवश्यक असणारा ३४ सदस्य संख्याबळाचा अकडा केव्हाच पार केला असून तो ४० पर्यत पोहचला आहे. त्यामुळे सत्ता स्थापण्याबाबतची फक्त औपचारिकता बाकी आहे. विरोधकांच्या सत्तेच्या दाव्याबाबत ते म्हणाले, कोणताही विरोधक हा सत्तेसाठी प्रयत्न करणारच, त्याप्रमाणे कोल्हापूरात विरोधी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनीही प्रयत्न सुरु केले आहेत, विविध राज्यातील निवडणूक निकालापूर्वीही विरोधकांनी उत्तरप्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येणार असा दावा केला होता, तसाच दावा कोल्हापूरात सुरु असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)