मी देईल तेवढं काम करतो अन् रात्री शांत झोपतो; मंत्री चंद्रकांत पाटलांची सावध भूमिका
By समीर देशपांडे | Updated: September 19, 2022 18:21 IST2022-09-19T15:35:50+5:302022-09-19T18:21:03+5:30
आता तर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र

मी देईल तेवढं काम करतो अन् रात्री शांत झोपतो; मंत्री चंद्रकांत पाटलांची सावध भूमिका
कोल्हापूर : ‘मी देईल तेवढंच काम करतो आणि रात्री शांत झोपतो’ अशी स्पष्ट भूमिका राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केली. ते कोल्हापुरात आज, सोमवारी पत्रकारांशी बोलत होते. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत विचारणा केली असता त्यांनी ही सावध भूमिका मांडली.
पाटील हे एखाद्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर देण्यासाठी प्रसिध्द आहेत. परंतू हल्ली त्यांनी या भूमिकेत बदल केला आहे. याचे प्रत्यंतर यावेळी आले. कोल्हापूर शहरातील अंगणवाड्यांना साहित्य वितरणानंतर पालकमंत्री नियुक्तीबाबतही विचारणा केल्यानंतर त्यांनी जे कोणी नवे पालकमंत्री येतील ते अंगणवाड्यांच्या प्रश्नांचा आढावा घेतील असे स्पष्ट करून कोणतेही अतिरिक्त भाष्य करणे टाळले.
आता तर अडचणच येणार नाही
सत्ता नसताना भाजपचा अनेक ठिकाणी झेंडा फडकला. आता तर भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना एकत्र आहे. त्यामुळे कोणत्याही निवडणुकीत अडचण येणार नाही असेही पाटील म्हणाले.