मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनाही धक्का?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 3, 2022 02:23 PM2022-07-03T14:23:56+5:302022-07-03T14:26:39+5:30

सत्तांतरानंतर आता जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र यड्रावकर यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले.

chandrakant patil likely to not included in maharashtra cabinet | मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनाही धक्का?

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांच्यापाठोपाठ चंद्रकांत पाटील यांनाही धक्का?

googlenewsNext

कोल्हापूर : 

सत्तांतरानंतर आता जिल्ह्यातून मंत्रिपदासाठी विनय कोरे, प्रकाश आबिटकर, राजेंद्र यड्रावकर यांची नावे आघाडीवर असल्याचे सांगण्यात आले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीवर लक्ष केंद्रित करावे. यासाठी संघटनेत राहावे, असाही प्रवाह असल्याचे समजते. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्रिपदाची संधी गेली व आता चंद्रकांतदादाही मंत्रिमंडळात नाहीत का असा विचार करून भाजपचे कार्यकर्तेही अस्वस्थं आहेत. भाजप नक्की काय निर्णय घेईल हे सांगता येणे कठीण असल्याचे सांगण्यात येते.

चंद्रकांत पाटील यांनी २०१४ ते २०१९ या काळात महसूल, सहकार, सार्वजनिक बांधकाम, कृषी, मदत आणि पुनर्वसन अशा विविध खात्यांचा कार्यभार सांभाळला. सध्या त्यांच्याकडे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आहे. येणारा काळ हा निवडणुकांचा असल्याने पाटील यांनी पूर्णवेळ संघटनेसाठी द्यावा, असा एक मतप्रवाह असल्याने भाजप कार्यकर्ते अस्वस्थ आहेत. परंतु पाटील यांच्या आतापर्यंतच्या कामाचा आवाका पाहता त्यांचा मंत्रिमंडळातील समावेश काहीजणांना पक्का वाटतों. तसे झाल्यास कोल्हापूर व पुण्याचे ते पालकमंत्रीही असतील. विनय कोरे यांचे नाव मंत्रिपदासाठी आघाडीवर आहे. गेल्या विधानसभेला त्यांनी भाजपच्या सूचनेवरून त्यांच्या जनसुराज्यकडून काही उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवले होते.

देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. त्यामुळे ते पालकमंत्रीही होऊ शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे. जिल्ह्यात भाजपला बळ देताना हसन मुश्रीफ आणि सतेज. पाटील यांना अंगावर घेण्याची अट मंत्रिपद देताना स्पष्टपणे घातली. जाईल, असे सांगण्यात आले. प्रकाश आवाडे हे भाजपचे तत्कालिन विद्यमान आमदार सुरेश हाळवणकर यांना पराभूत करून निवडून आले. तातडीने त्यांनी भाजपला पाठिंबाही जाहीर केला. राष्ट्रवादीचे नेते शदर पवार आणि काँग्रेसमधील अनेक ज्येष्ठ नेत्यांशी जवळचे संबंध असूनही त्यांनी जिल्ह्याच्या राजकारणातही सर्व निवडणुकांमध्ये भाजपला पूरक भूमिका घेतली आहे. आवाडे यांच्या ताकदीचा पूर्ण क्षमतेने उपयोग करून घेण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यांना केंद्राकडून वस्त्रोद्योगासाठी भरीव मदत आणि लोकसभेसाठी राहुल आवाडे यांच्या उमेदवारीबाबत विचार केला जाणार असल्याने त्यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची .

प्रकाश आबिटकर यांना संधी
आमदार प्रकाश आबिटकर हे दुसऱ्यांदा आमदार झाले आहेत. राजेंद्र पाटील अपक्ष निवडून आले, परंतु त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रिपद दिले गेल्याने टिकट अडीच वर्षे नाराज होता. यातूनच मग ते शिंदे यांच्यासोबत गेले. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात ताकद निर्माण करण्यासाठी आबिटकर यांना मंत्रिपद मिळू शकते.

यड्रावकरांच्या जोडण्या.. 
राजेंद्र पाटील यड्रावकर यांना शिवसेनेकडे पाठवून शरद पवार यांच्या सांगण्यावरून त्यांना मंत्रिपद दिल्याची चर्चा त्यावेळी जोरात होती. राज्यमंत्री असतानाही त्यांनी बंड केले असल्याने त्यांचे मंत्रिपद कायम राहील असे दिसते. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उलाढाली सुरू आहेत.

राजेश क्षीरसागर विधानपरिषदेवर 
राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या यादीमध्ये राजेश क्षीरसागर यांचा समावेश होण्याचीही रा शक्यता वर्तवण्यात येत आहे. तोपर्यंत किमान नियोजन मंडळाचे कार्याध्यक्षपद हे कॅबिनेट पदाचा दर्जा असलेले पद कायम राहण्याचीही शक्यता आहे.

Web Title: chandrakant patil likely to not included in maharashtra cabinet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.