चंद्रकांत पाटील पुन्हा प्रदेशाध्यक्ष ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 15, 2020 12:31 PM2020-01-15T12:31:19+5:302020-01-15T12:32:45+5:30
भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे. महाराष्ट्राचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीच पाटील यांचे आगावू अभिनंदन केले आहे.
कोल्हापूर : भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा एकदा चंद्रकांत पाटील यांची फेरनिवड निश्चित मानली जात आहे. महाराष्ट्राचे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम करणारे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनीच पाटील यांचे आगावू अभिनंदन केले आहे.
गेले दोन दिवस भाजपच्या कोल्हापूर महानगर आणि ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम घेण्यात आला होता. सोमवार (दि. १३) आणि मंगळवारी झालेल्या दोन्ही कार्यक्रमांमध्ये हाळवणकर यांनी आता भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आणि प्रदेशाध्यक्षपदाचीही येत्या काही दिवसांत निवडणूक होणार असल्याचे सांगितले. तसेच पुन्हा एकदा प्रदेशाध्यक्ष पदावर पाटील यांचीच निवड निश्चित असल्याचेही त्यांनी सांगून टाकले.
सत्ता गेल्यानंतर ज्या पद्धतीने भाजपमधील मतभेद उफाळले आहेत, ते पाहता समन्वय साधणाऱ्या नेतृत्वाची गरज असल्याने हे काम गेली काही वर्षे चोखपणे करत असणाºया पाटील यांनाच पुन्हा संधी दिली जाणार असल्याचे सांगण्यात येते.