आजही शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार, पण निवडणुका स्वतंत्र लढवणारः चंद्रकांत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2020 01:05 PM2020-07-28T13:05:55+5:302020-07-28T13:07:52+5:30

राज्याच्या हितासाठी आज देखील शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Chandrakant Patil is still dreaming of power, he said .. a government can be formed with Shiv Sena | आजही शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार, पण निवडणुका स्वतंत्र लढवणारः चंद्रकांत पाटील

आजही शिवसेनेसोबत एकत्र येण्यास तयार, पण निवडणुका स्वतंत्र लढवणारः चंद्रकांत पाटील

Next
ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांना अजूनही पडताहेत सत्तेची स्वप्नेम्हणाले..शिवसेनेसोबत बनू शकते सरकार

कोल्हापूर - राज्याच्या हितासाठी आज देखील शिवसेनेसोबत आम्ही एकत्र येऊन सरकार स्थापन करण्यास तयार असल्याचं वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शिवसेना आणि भाजप जरी एकत्र आले तरी निवडणुका मात्र वेगवेगळ्या लढू असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील म्हणाले की राज्यामध्ये भाजपकडे सगळ्यात जास्त आमदार आहेत आणि भाजपच्याच मदतीने शिवसेनेचे ५६ आमदार निवडून आले आहेत. मोदींच्या सभांचा फायदा शिवसेनेला झाला आहे.अशावेळी शिवसेना विरोधात बसली असते तरी चालले असते, मात्र ते सत्तेसाठी दोन्ही काँग्रेससोबत गेल्याचा आरोप पाटील यांनी केला, त्यामुळे आगामी काळात जरी राज्याच्या हितासाठी एकत्र आलो तरी निवडणुका मात्र वेगळ्याच लढल्या जातील असा ठाम विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

महाविकास आघाडी सरकार स्थापन होण्याआधी या दोन्ही पक्षांना लक्षात आले नाही का? असं विचारलं असता आम्ही तयार होतो, मात्र शिवसेनेने वेगळी भूमिका घेतली. ५६ आमदार असलेल्या शिवसेनेला मुख्यमंत्रिपद कसे द्यायचे असा सवाल देखील त्यांनी केला? त्यावेळी महत्त्वाची खाती शिवसेनेकडे देण्यासंदर्भात चर्चा झाली होती, मात्र शिवसेनेला ते मान्य नव्हते असंही ते म्हणाले.

या संदर्भातले सगळे निर्णय हे केंद्राच्या पातळीवरून होत असतात, त्यामुळे मोदींनी फॉर्म्युला तयार केला आणि उद्धव ठाकरेंनी तो मान्य केला तर या सगळ्या पुढच्या गोष्टी असतील असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

लहान मुलंही तिन्ही पक्षांबाबत नाराजी व्यक्त करतील

सध्या राज्य एका बिकट परिस्थितीमधून जात आहे. तिन्ही पक्षांना राज्याच्या हिताच्या संदर्भातले निर्णय घेता येत नाहीत, लहान मुलांना जरी निबंध लिहायला सांगितले तरी ते या तिन्ही पक्षांबाबत नाराजी व्यक्त करतील असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Web Title: Chandrakant Patil is still dreaming of power, he said .. a government can be formed with Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.