चंद्रकांत पाटील, मातोश्रीवर टीका करताना विचार करा, पायदळी यायला वेळ लागणार नाही : क्षीरसागर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2020 05:23 PM2020-07-27T17:23:02+5:302020-07-27T20:22:36+5:30
मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवलंय. त्यामुळे टीका करताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विचार करा, पायदळी यायला वेळ लागणार नाही, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राजकारणात आंबा पडल्यासारखे अचानक मोठे झाले आहेत. मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो, हे नारायण राणे यांनी अनुभवलंय. त्यामुळे टीका करताना विचार करा, पायदळी यायला वेळ लागणार नाही, अशी टीका राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सीपीआरमध्ये खाट व कपाटे वाटप करण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. राजेश क्षीरसागर म्हणाले, चंद्रकांत पाटील यांच्या टीकेमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कामावर परिणाम होणार नाही. मुख्यमंत्री ठाकरे हे संयमी नेतृत्व आहे. राज्यभर उगाच दिंडोरा पिटवून राज्यकारभार होत नाही. चंद्रकांत पाटलांना युतीचा इतिहास माहीत नसेल. गेल्या तीस वर्षांपासून भाजप आणि शिवसेना यांची युती होती. या कालावधीत ह्यमातोश्रीह्णवरील नेत्यांनी कधीही माध्यमातून प्रतिक्रिया न देता केवळ आपल्या मुखपत्रातून मत व्यक्त केले. ह्यमातोश्रीह्णवर टीका करणाऱ्यांचा शेवट काय होतो हे नारायण राणे यांनी अनुभवलं आहे. त्यामुळे टीका करताना विचार करून करावी, असा सल्लाही क्षीरसागर यांनी दिला.
- राजाराम लोंढे