चंद्रकांत पाटील यांची घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2018 11:59 PM2018-12-30T23:59:35+5:302018-12-30T23:59:39+5:30

कोल्हापूर : आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचा वापर करून सामुदायिक शेती ही काळाची गरज बनली आहे. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार ...

Chandrakant Patil's announcement | चंद्रकांत पाटील यांची घोषणा

चंद्रकांत पाटील यांची घोषणा

googlenewsNext

कोल्हापूर : आधुनिक तंत्रज्ञान व यंत्रसामग्रीचा वापर करून सामुदायिक शेती ही काळाची गरज बनली आहे. तिला प्रोत्साहन देण्यासाठी सरकार अल्प व्याजाने एक कोटीपर्यंतचे कर्ज देणार असल्याची घोषणा कृषी व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून देशभरातील नवतंत्रज्ञान एकाच छताखाली आणल्याबद्दल आमदार सतेज पाटील यांचे त्यांनी कौतुकही केले.
तपोवन मैदानावर सुरू असलेल्या ‘सतेज कृषी’ प्रदर्शनास रविवारी मंत्री पाटील यांनी भेट दिली. मंत्री पाटील म्हणाले, काळाच्या ओघात दहा-दहा गुंठे शेती राहिल्याने आधुनिक यंत्रे वापरून शेती करणे अवघड आहे. यासाठी १००-२०० शेतकऱ्यांनी एकत्रित येत सामुदायिक शेतीचा प्रयोग केला पाहिजे.
त्याला प्रोत्साहन देण्यासाठी संबंधित गटाला अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्जही देण्याचा प्रयत्न आहे. कृषी प्रदर्शनाचा उद्देश विशद करीत आमदार सतेज पाटील म्हणाले, यंदा उसाच्या उत्पादनात घट झाल्याने शेतकºयांना कर्जाची परतफेड करणे अवघड होणार आहे, यासाठी मंत्री पाटील यांनी लक्ष
घालावे.
मंत्री पाटील यांनी विविध स्टॉलवर जाऊन पाहणी केली. त्यांच्यासोबत डी. वाय. पाटील शिक्षण संस्थेचे विश्वस्त ऋतुराज पाटील, उपमहापौर भूपाल शेटे, आदी उपस्थित होते.
एकीकडे आत्महत्या
आणि यशोगाथाही
राज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्या करताना दिसतात आणि दुसºया बाजूला अनेक प्रयोगशील शेतकºयांच्या यशोगाथाही आहेत. प्रदर्शनातून त्या पाहावयास मिळत असून अशी प्रदर्शने दिशादर्शक ठरत असल्याचेही मंत्री पाटील यांनी सांगितले.

Web Title: Chandrakant Patil's announcement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.