चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आरोग्यम‌् म्हणून साजरा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2020 02:10 PM2020-06-08T14:10:26+5:302020-06-08T14:13:26+5:30

भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा बुधवारी (दि. १०) होणारा वाढदिवस आरोग्यम‌् म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून दिली.

Chandrakant Patil's birthday will be celebrated as Arogyamatra | चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आरोग्यम‌् म्हणून साजरा होणार

चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आरोग्यम‌् म्हणून साजरा होणार

googlenewsNext
ठळक मुद्देचंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस आरोग्यम‌् म्हणून साजरा होणार ताप मोजण्याचे १२० थर्मामीटर गरजू व दुर्लक्षित घटकांना दिले जाणार

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांचा बुधवारी (दि. १०) होणारा वाढदिवस आरोग्यम‌् म्हणून साजरा करण्यात येणार असल्याची माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे यांनी पत्रकातून दिली.

आरोग्यम‌् उपक्रमांतर्गत ताप मोजण्याचे १२० थर्मामीटर गरजू व दुर्लक्षित घटकांना दिले जाणार आहे. त्याचबरोबर थर्मल मशीन, हौसिंग सोसायटी व अपार्टमेंटमध्ये सॅनिटायझर स्टँडही देण्यात येणार आहे.

कोल्हापूर शहरातील ८१ प्रभागांत वृक्षारोपण, नागरिकांना होमिओपॅथिक औषधांचे वाटप, रक्तदान शिबिरे, आयुष्यमान योजना कार्ड वितरण, गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता, आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत.

ज्यांना वाढदिवसानिमित्त थर्मामीटर, थर्मल मशीन, आदी द्यायचे आहे, त्यांनी संवेदना सोशल फौंडेशन यांच्याकडे नावे नोंदवावीत, असे आवाहन राहुल चिकोडे यांनी केले आहे. आमदार चंद्रकांत पाटील हे प्रत्यक्षात शुभेच्छा स्वीकारणार नाहीत; मात्र आरोग्यम उपक्रमाच्या माध्यमातून मात्र ते शुभेच्छा स्वीकारणार आहेत.

 

Web Title: Chandrakant Patil's birthday will be celebrated as Arogyamatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.