कोल्हापूरसाठी काय केले, बिंदू चौकात सामना होऊ दे; चंद्रकांत पाटलांचे सतेज पाटलांना आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 11:37 AM2022-03-24T11:37:12+5:302022-03-24T11:37:49+5:30

कोल्हापूर : शहरातील नागरिकांना त्यांच्या चारचाकी गाडीच्या किमतीएवढा टोल ३० वर्षे भरावा लागला असता त्याची तुम्ही पावती फाडली, परंतु ...

Chandrakant Patil's challenge to Satej Patel | कोल्हापूरसाठी काय केले, बिंदू चौकात सामना होऊ दे; चंद्रकांत पाटलांचे सतेज पाटलांना आव्हान

कोल्हापूरसाठी काय केले, बिंदू चौकात सामना होऊ दे; चंद्रकांत पाटलांचे सतेज पाटलांना आव्हान

googlenewsNext

कोल्हापूर : शहरातील नागरिकांना त्यांच्या चारचाकी गाडीच्या किमतीएवढा टोल ३० वर्षे भरावा लागला असता त्याची तुम्ही पावती फाडली, परंतु भाजपने ४७३ कोटी रुपये भरून टोल घालवला. त्यामुळे तुम्ही कोल्हापूरसाठी काय केले आणि आम्ही काय केले याचा जाहीर सामना बिंदू चौकात होऊन जाऊ देे, असे आव्हान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री सतेज पाटील यांना दिले.

‘कोल्हापूर उत्तर’चे भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या सभेत ते बोलत होते. यावेळी मोठे शक्तिप्रदर्शन करत कदम यांनी अर्ज दाखल केला.

पाटील म्हणाले, २०१९ ला महापूर आला असताना तातडीने सर्व घटकांसाठी मदत देण्याचा आदेश काढला. वेळ जायला नको म्हणून रोख रक्कम दिली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तर महाविकास आघाडीत असूनही राजू शेट्टी यांच्यावर आंदोलनाची वेळ आली. विमानतळासाठी केंद्र सरकारने २७३ कोटी देण्याआधी राज्य शासनाचे ८० कोटी रुपये आम्ही दिले. तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी आम्ही निधी दिला. परंतु तुम्हाला तो राबवता आला नाही. थेट पाईपलाईनचे पाणी आले नाही तर निवडणूक लढवीत नाही म्हणाला हाेता. परंतू अजून पाण्याचा पत्ता नाही.

धनंजय महाडिक म्हणाले, यांना केवळ सर्व सत्ताकेंद्रे ताब्यात हवीत. विकास कामांची चर्चा नको आहे. शिवसेनेची अवस्था तर ‘तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशी झाली आहे. कोल्हापूरचा भगवा आता आमचा पेटंट आहे. काही जणांना पोलिसांकडून त्रास देणे सुरू आहे. परंतु मोदींनी राबविलेल्या योजना जनतेपर्यंत पोहोचवून भाजपचा झेंडा फडकवा.

सुरेश हाळवणकर म्हणाले, कोणाची मस्ती कशी उतरवायची, हे कोल्हापूरच्या जनतेला माहीत आहे. बंटी पाटील यांच्या अहंकाराविरोधात, हुकूमशाहीविरोधातील ही निवडणूक आहे. यावेळी सत्यजित कदम, जयंत पाटील, शहाजी कांबळे यांची भाषणे झाली. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, माजी आमदार अमल महाडिक, महेश जाधव, विजय जाधव, विजय सूर्यवंशी, राहुल आवाडे, पृथ्वीराज महाडिक, उत्तम कांबळे, सुनील कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

मराठा समाजावर अन्याय

समरजित घाटगे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला ज्या सुविधा दिल्या त्या देणेही सध्या महाविकास आघाडीला जमलेले नसल्याने, राज्यातील मोठ्या समाजावर अन्याय करण्याचे काम सुरू आहे. मंत्र्यांच्या गाड्यांसाठी बिनव्याजी कर्ज देण्यासाठी निधी आहे. मात्र आण्णासाहेब पाटील महामंडळाच्या कर्जप्रकरणांचे व्याज देण्यासाठी निधी नाही. माझे वडील विक्रमसिंह घाटगे हे २०१४ मध्ये सत्यजित कदम यांच्या प्रचारात होते. त्यांचे अर्धे राहिलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे.

...तर अडवून चिंध्या करू

प्रकाश आवाडे म्हणाले, काश्मीरमधील ३७० वे कलम रद्द केल्यानंतर मी नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले म्हणून माझ्याकडे विचारणा झाली, तेव्हा मी पक्षच सोडला. कोल्हापूर जिल्ह्यातील वातावरण बदलले आहे. हा जिल्हा कुणाची बटिक नाही. संपत्तीच्या आणि सत्तेच्या जोरावर जर कोणी मागून फरफटत न्यायचा प्रयत्न केला तर अडवून चिंध्या केल्याशिवाय राहणार नाही.

Web Title: Chandrakant Patil's challenge to Satej Patel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.