बदल्यांबाबत मुश्रीफ म्हणतात ... चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2020 04:09 PM2020-08-18T16:09:27+5:302020-08-18T16:10:49+5:30

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बदल्यांची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी करत आहेत, ती आम्ही केव्हाच मान्य केली आहे. मात्र महायुतीच्या काळातील बदल्यांमध्ये अनेक विक्रम करणाऱ्यांकडून ही मागणी ऐकून आर्श्चयाचा धक्का बसला असून पाटील यांचे बदल्यांबाबतचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके चली बिली हजं को अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केली.

Chandrakant Patil's statement about transfers is Mrs. Chuhe Khake .... Criticism of Hasan Mushrif | बदल्यांबाबत मुश्रीफ म्हणतात ... चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके...

बदल्यांबाबत मुश्रीफ म्हणतात ... चंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके...

Next
ठळक मुद्देबदल्यांबाबत मुश्रीफ म्हणतातचंद्रकांत पाटील यांचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके...

कोल्हापूर : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे बदल्यांची सीआयडी मार्फत चौकशीची मागणी करत आहेत, ती आम्ही केव्हाच मान्य केली आहे. मात्र महायुतीच्या काळातील बदल्यांमध्ये अनेक विक्रम करणाऱ्यांकडून ही मागणी ऐकून आर्श्चयाचा धक्का बसला असून पाटील यांचे बदल्यांबाबतचे वक्तव्य म्हणजे सौ चुहे खाके चली बिली हजं को अशी टीका ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी केली.

चंद्रकांत पाटील हे महसूल, बांधकाम, कृषी, मदत, पुर्नवसन आदी महत्वाच्या विभागाचे मंत्री होते. त्यांनीच गेल्या सहा महिन्यात झालेल्या बदल्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सीआयडी चौकशीची मागणी मान्य केलीच, त्याचबरोबर २०१४ पासून बदल्यांची चौकशी करू, असेही सांगितले आहे. मूळात कोरोनाच्या कालावधीत बदल्याच करू नये, असेच आघाडी सरकारचे धोरण होते. मात्र युती शासनात आणले गेलेले काही अधिकारी आजही त्यांच्या खाल्या मिठाला जागतात. त्यामुळे हेच अधिकारी महाविकास आघाडीला बदनाम करत आहेत. म्हणून बदल्या करण्याचा निर्णय घेतला, तेही मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी अवघ्या १५ टक्के बदल्या करण्याचा निर्णय घेतल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

त्या बदल्यांची अजूनही चर्चा आहे.......

युती सरकारच्या काळातील व आता त्यांच्या खाल्या मिठाला जागणाऱ्या अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याने चंद्रकांत पाटील यांचे पित्त खवळले आहे. मागील पाच वर्षात कशा पध्दतीने बदल्या झाल्या, याची अजूनही दबक्या आवाजात चर्चा सुरू असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
 

Web Title: Chandrakant Patil's statement about transfers is Mrs. Chuhe Khake .... Criticism of Hasan Mushrif

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.