चंद्रकांतदादा तुमची हिमालयात नव्हे, कोल्हापुरात गरज : हसन मुश्रीफ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 3, 2020 06:11 PM2020-11-03T18:11:53+5:302020-11-03T18:13:34+5:30
politics, chandrkantdadapatil, hasanmusrif, kolhapurnews कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा आमदारच नाही तर चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोण आणि कशासाठी राजीनामा देणार. हे होणार नाही हे चंद्रकांतदादांना माहित आहे त्यामुळे त्यांना हिमालयात जावे लागणार नाही. त्यांची कोल्हापुरातच गरज असल्याचे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिले. कोल्हापूरमधून त्यांनी निवडणूक न लढविल्याबद्दल मी टीका केली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कोल्हापूर- जिल्ह्यात भाजपचा आमदारच नाही तर चंद्रकांत पाटील यांच्यासाठी कोण आणि कशासाठी राजीनामा देणार. हे होणार नाही हे चंद्रकांतदादांना माहित आहे त्यामुळे त्यांना हिमालयात जावे लागणार नाही. त्यांची कोल्हापुरातच गरज असल्याचे प्रत्युत्तर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी मंगळवारी दिले. कोल्हापूरमधून त्यांनी निवडणूक न लढविल्याबद्दल मी टीका केली नव्हती, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी पुण्यात जाहीर कार्यक्रमात बोलताना मी कोल्हापुरातील कोणत्याही मतदारसंघातून निवडून येऊ शकतो.जिल्ह्यातील कोणत्याही आमदारांने राजीनामा द्यावा, मी त्या मतदारसंघातून निवडणूक लढवेन. मला हरणे माहित नाही. निवडून आलो नाही, तर मी हिमालयात जाईन असे आव्हान दिले होते. पाटील यांच्या आव्हानाला मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.
मुश्रीफ पत्रकात म्हणतात, विधानसभा निवडणुका होऊन एक वर्ष झालेले आहे, विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षे शिल्लक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचा एकही आमदार निवडून आलेला नाही, त्यामुळे पाटील यांच्यासाठी राजीनामा कोण देणार ? कशासाठी? असे होणार नाही, हे दादांना माहित आहे. तसेच कोथरुडमधून ज्या आमच्या मेघा कुलकणीर्ना डावलून निवडून आला आहात, तिथे राजीनाम्यासाठी भाजप परवानगी देणार नाही. हे पाटील यांना माहिती आहे. दोन्हींही गोष्टी केवळ अशक्य आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांना हिमालयामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. आम्हांला तुमची येथेच गरज आहे.