मानवता व सेवाधर्मामुळेच चंद्रशेखर शिवाचार्यांच्या जीवनाचे सार्थक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:27 AM2021-09-14T04:27:54+5:302021-09-14T04:27:54+5:30

नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती लिंगैक्य श्री. ष. ब्र. १०८ उपाचार्यरत्न चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या समाधी समर्पण ...

Chandrashekhar Shivacharya's life is meaningful only because of humanity and service religion | मानवता व सेवाधर्मामुळेच चंद्रशेखर शिवाचार्यांच्या जीवनाचे सार्थक

मानवता व सेवाधर्मामुळेच चंद्रशेखर शिवाचार्यांच्या जीवनाचे सार्थक

Next

नूल (ता. गडहिंग्लज) येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती लिंगैक्य श्री. ष. ब्र. १०८ उपाचार्यरत्न चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांच्या समाधी समर्पण व शिवगणाराधना कार्यक्रमानिमित्त आयोजित धर्मसभेच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. स्वामीजी म्हणाले, मनुष्य जन्माला आला की जग हसत असते आणि त्याच्या मरणानंतर रडते. मधल्या काळातील त्याचे केलेले कार्यकर्तृत्वच त्यांची उंची ठरविते. ‘कबीरा’च्या या वचनाप्रमाणे चंद्रशेखर स्वामींजींनीही आपल्या कार्यकर्तृत्वानेच ती उंची गाठली. नूतन मठाधिपती गुरुसिद्धेश्वर स्वामीजी यांना सेवाव्रतामुळेच उत्तराधिकारी म्हणून धुरा सांभाळण्याची संधी मिळाली आहे. मठाची उज्ज्वल परंपरा आणि वारसा ते नक्तीच पुढे चालवतील. खासदार मंडलिक म्हणाले, चंद्रशेखर स्वामीजींचे पश्चिम महाराष्ट्र व उत्तर कर्नाटकातील भक्तगणांना मोलाचे मार्गदर्शन होते. स्वामीजींच्या समाधी समर्पण व शिवगणाराधना कार्यक्रमास उपस्थित राहायला मिळाले हे मी माझे भाग्य समजतो. स्वामीजींचा विचार आपण सर्वजण मिळून पुढे नेऊया.

सुरगीश्वर मठाचे नूतन मठाधिपती गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य म्हणाले, मठात येणारी प्रत्येक व्यक्ती ही आपली आहे. त्यांच्या सेवेबरोबरच मठाच्या परंपरेचा वारसा आपण पुढे चालविणार आहोत. त्यासाठी चंद्रशेखर स्वामीजींनी व श्रीशैल जगद्गुरूंनी केलेले मार्गदर्शन कामी येईल.

प्रारंभी सुरगीश्वर मठाकडील मुरगेंद्र हिरेमठ, सुशीला हिरेमठ, दिलीप मांजरेकर, बसाराम गरासिया, निखिल विभुते, अजित स्वामी, रवींद्र खवणे, रामा नावलगी, शिवानंद तराळ या सेवार्थींचा सत्कार करण्यात आला. धर्मसभेला जिंतूरचे अमृतेश्वर शिवाचार्य, बेळंकीचे शिवलिंग शिवाचार्य, धारेश्वरचे नीळकंठ शिवाचार्य, शिरकोळचे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य, होटगीचे शिवयोगी शिवाचार्य यांनी संबोधित केले. याप्रसंगी सरपंच प्रियांका यादव, जंगम समाजाचे जिल्हाध्यक्ष, अशोक स्वामी, राजा माळगी, बसवराज आजरी, गणेश जंगम, उपसरपंच प्रवीण शिंदे, जयसिंग चव्हाण यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास आमदार राजेश पाटील, माजी आमदार श्रीपतराव शिंदे, गडहिंग्लजच्या नगराध्यक्षा स्वाती कोरी, पं.स. सदस्या बनश्री चौगुले, सुरेश कुराडे, सोमगोंडा आरबोळे, महाबळेश्वर चौगुले, अजित नडगदल्ली आदी उपस्थित होते. विनोद नाईकवाडी यांनी प्रास्ताविक केले.

Web Title: Chandrashekhar Shivacharya's life is meaningful only because of humanity and service religion

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.